अन् शिवसेनेच्या आमदाराचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल

Shiv Sena MLA dances to the song 'Main Hoon Don' : उदयसिंग राजपूत जेव्हा लग्नसमारंभात पोहोचले तेव्हा नवरदेवाची वरात डीजेच्या तालावर निघाली होती. आणि मागे रथात वधू-वर बसले होते. डीजेच्या तालावर अनेकजण नाचत होते. यावेळी राजपूत तिथे येताच आमदार राजपूत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डान्स करावा असा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी केलेली मागणी राजपूत यांनी मान्य केली आणि डीजेवर सुरु असलेल्या 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर गाण्यावर जोरदार ठेका धरला.

Shiv Sena MLA dances to the song 'Main Hoon Don'
अन् शिवसेनेच्या आमदाराचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमदार उदयसिंग राजपूत यांनी एका लग्नात हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका
  • 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर राजपूत यांनी ठेका धरला.
  • आमदार डान्स करत असल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली

औरंगाबाद : कन्नड मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांचा एक व्हिडीओ मोठा व्हायरल होताना दिसत आहे. आमदार उदयसिंग राजपूत यांनी एका लग्नात हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा हा व्हिडिओ आहे. एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात राजपूत यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी तेथेच उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने हा व्हिडीओ शूट केला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, अनेक आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, आमदार उदयसिंग राजपूत यांनी शिंदे गटात सामील न होता उद्धव ठाकरेंच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत. हेच आमदार उदयसिंग राजपूत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच आता राजपूत यांनी एका लग्नात हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे. 

अधिक वाचा : जगातील सर्वात महागडे पनीर...किंमत 70 हजार रुपये प्रति किलो

आमदार डान्स करत असल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली

आपल्या मतदारसंघातील एका लग्न समारंभात रविवारी आमदार उदयसिंग राजपूत यांनी हजेरी लावली होती. उदयसिंग राजपूत जेव्हा लग्नसमारंभात पोहोचले तेव्हा नवरदेवाची वरात डीजेच्या तालावर निघाली होती. आणि मागे रथात वधू-वर बसले होते. डीजेच्या तालावर अनेकजण नाचत होते. यावेळी राजपूत तिथे येताच आमदार राजपूत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डान्स करावा असा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी केलेली मागणी राजपूत यांनी मान्य केली आणि डीजेवर सुरु असलेल्या 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर गाण्यावर जोरदार ठेका धरला. आमदार डान्स करत असल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. तर काही जणांनी त्यांच्यासोबत डान्स करण्याचा आनंद लुटला. यावेळी राजपूत यांनी सुद्धा मनसोक्तपणे डान्स केला. आमदार राजपूत यांनी केलेल्या या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मिडिया वरती प्रचंड व्हायरल होत आहे.

अधिक वाचा : आजारी शिक्षकाने सोनू सूदकडे मागितली मदत, मात्र झाला फ्रॉड 

शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही – उदयसिंग राजपूत

उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे यांनी बंद केल्यानंतर अनेक आमदारांना फोन येत असून, अनेक ऑफर मिळत असल्याचं त्यांनी एका कार्यकर्त्याला फोनवर बोलत असताना म्हटलं होत. आमदार फोडण्यासाठी ५०  कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एका शिवसेना कार्यकर्त्यासह बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मात्र, ती ऑफर आपण स्वीकारली नाही. कारण मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार असल्याचं राजपूत यांनी त्या फोन कॉलमध्ये म्हटलं होत.

अधिक वाचा : गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह परत येतील - संजय राऊत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी