उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे देखील नॉट रिचेबल आहेत. तानाजी सावंत हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तानाजी सावंत हे भूम – परंडा – वाशीचे आमदार आहेत. दरम्यान सावंत हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : या गोष्टींचे सेवन केल्याने झपाट्याने होईल वजन कमी
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराला दगाफटका झाल्यानंतर शिवसेनेचे १३ आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. शिवसेना पक्षातील अंतर्गत धुसफूस या निमित्ताने जाहीरपणे चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा आहे. नॉट रिचेबल असणारे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे समर्थक असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफूसही मोठं स्वरूप घेत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अधिक वाचा ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींना द्या शुभेच्छा
भूम – परंडा – वाशीचे शिवेसेने आमदार तानाजी सावंत यांनी आज सत्ताबदलचा सुचक इशारा दिला होता, ते अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाचा इशारा दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तानाजी सावंत हे पक्ष सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मी शिवसेना पक्षात आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. मी शिवसेना पक्षातच राहणार आहे असा खुलासा तानाजी सावंत यांनी केला आहे. तसेच बदनामीसाठी हे सारं केलं जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.
अधिक वाचा ; या गोष्टींचे सेवन केल्याने झपाट्याने होईल वजन कमी
सलग ३ वेळा निवडणून आलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल झाले आहेत. आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा, लोहाराचे आमदार आहेत. चौगुले हे नॉट रिचेबल झाले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले हे अनेक दिवसांपासून नाराज असल्याची देखील माहिती आहे.
शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज आमदार ज्ञानराज चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्री पद न मिळाल्याने चौगुले हे नाराज होते तर त्यांना नेहमी डावलन्यात आले असल्याचे नेहमी दिसलें आहे. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद असून ते काल पासून इतर आमदार यांच्या संपर्क बाहेर आहेत.