उस्मानाबाद : शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. राऊत यांच्या घरावर ईडीने मारलेल्या छापेमारीनंतर याचे पडसाद आज उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. शिवसेनेचे उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत प्रदर्शन देखील केले आहे. त्याचबरोबर कैलास पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
अधिक वाचा ; नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, CCTV VIDEO आला समोर
राऊत यांच्यावरील कारवाई चुकीची – कैलास पाटील
कैलास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ईडी ही जाणीवपूर्वक संजय राऊत याना त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी संसदेचे अधिवेशन चालू आहे माझ्यावर कारवाई आताच होऊ नये अशी विनंती केलेली असतानाही त्यांच्यावर चुकीची कारवाई केली असून त्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिली आहे. यावेळी आमदार कैलास पाटलांसह कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.
अधिक वाचा ; जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक
नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल – संजय शिरसाट
नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये असेही शिरसाठ यांनी म्हटले. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी ४० वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले
आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत का असावं याबाबत सातत्याने सांगायचे. त्याचाच हा परिणाम असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एक दिवस उद्धव ठाकरे हेच संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढतील असे शिरसाट यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले असल्याचा आरोप देखील शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.