शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले....

Shiv Sena MP Omraje Nimbalkar's big statement : शिवसेनेचा एकही खासदार उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेना पक्षाला सोडून जाणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम व सत्ता दिली. त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Shiv Sena MP Omraje Nimbalkar's big statement
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचा एकही खासदार शिवसेनेला सोडून जाणार - ओमराजे निंबाळकर
  • अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही – ओमाराजे निंबाळकर
  • राणाजगजीतसिंह पाटील यांना केवळ माझ्यामुळे शिवसेना पक्षात घेतले नाही – ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद : एकेकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खंदेसमर्थक मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी आता बंडखोरी केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार घेऊन थेट गुवाहटी गाठली असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात आले आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या गळाला आणखी शिवसेनेचे आमदारांसोबत काही खासदार देखील लागत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेचा एकही खासदार शिवसेनेला सोडून जाणार नसल्याचं वक्तव्य उस्मानाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर केले आहे. शिवसेनेचे खासदार शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याच्या निव्वळ अफवा देखील असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंना आणखी धक्का? अनेक नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात

अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही – ओमाराजे निंबाळकर

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओमाराजे निंबाळकर यांनी शिवसेनेचा एकही खासदार उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेना पक्षाला सोडून जाणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम व सत्ता दिली. त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आपण शिवसेनेच्या सर्वच खासदारांच्या संपर्कात असतो. त्यामुळे शिवसेनाचा एकही खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार नाही, हे मला माहीत असल्याचे खासदार निंबाळकर यांनी ठामपणे सांगितले आहे.

अधिक वाचा : बंडखोरीमागे 'भाजप'चा हात असलेला Exclusive व्हिडिओ समोर  

राणाजगजीतसिंह पाटील यांना केवळ माझ्यामुळे शिवसेना पक्षात घेतले नाही – ओमराजे निंबाळकर

पुढे बोलताना ओमराजे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी माझा संघर्ष पहिला आहे. आणि केवळ माझ्यामुळेच उध्दव ठाकरेंनी माझ्या विरोधकाला म्हणजे राणाजगजीतसिंह पाटील यांना शिवसेना पक्षात घेतले नाही असं देखील ओमराजे यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीवेळी उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी राणा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याची तयारी दाखवली. मात्र माझा संघर्ष त्यांनी बघितलेला असल्याने त्यांनी राणा पाटलांना तिकिट नाकारले, असा गौप्यस्फोट खासदार निंबाळकर यांनी यावेळी केला आहे.

अधिक वाचा : गुवाहाटीतील आलिशान हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांचा रोजचा खर्च

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी