अब्दुल सत्तारांना शह देण्यासाठी शिवसेना आखणार मोठी रणनीती

औरंगाबाद
Updated Jul 26, 2022 | 18:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Sena will plan a big strategy against Abdul Sattar : येत्या काळात राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे. शिंदे गटात गेलेल्या बंडखोर सत्तारांना देखील धडा शिकविण्यासाठी आता शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेनच्या वतीने सत्तार यांच्या मतदारसंघात देखील भव्य मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर शिवसेनाही सत्तार यांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करेल असं खैरे यांनी सांगितलं आहे.

Shiv Sena will plan a big strategy against Abdul Sattar
अब्दुल सत्त्तारांना शह देण्यासाठी शिवसेना आखणार मोठी रणनीती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सत्तार येत्या ३१ तारखेला औरंगाबादेत भव्य मेळावा आयोजित करत शक्तीप्रदर्शन करणार आहेत
  • या मेळाव्याला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत
  • सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळण्याची भीती वाटते त्यामुळेच आयोजित केला मेळावा

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला नवा गट स्थापन केला आहे. शिंदे यांनी केलेल्या या बंडखोरीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर मुंबई येथे देखील आपले शक्तीप्रदर्शन केले होते. मुंबईनंतर एकनाथ सत्तार आता येत्या ३१ तारखेला औरंगाबादेत भव्य मेळावा आयोजित करत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. सत्तार यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. सत्तार हे मेळाव्या दिवशी मोठी रॅली देखील काढणार आहे. सत्तार यांच्या या मेळाव्यानंतर शिवसेनेनं देखील धडा शिकविण्यासाठी रणनिती आखली असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा : 'या' गावातील महिला पाच दिवस घालत नाही कपडे, काय आहे कारण?

नेमकी काय आहे शिवसेनेची रणनीती?

येत्या काळात राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे. शिंदे गटात गेलेल्या बंडखोर सत्तारांना देखील धडा शिकविण्यासाठी आता शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेनच्या वतीने सत्तार यांच्या मतदारसंघात देखील भव्य मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर शिवसेनाही सत्तार यांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करेल असं खैरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच सिल्लोडकरांना एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार असल्याने मतदार संघातील लोकांना मात्र कुठल्या गटात सामील व्हावे असा प्रश्न पडला आहे.

अधिक वाचा ; Second hand car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही घ्या काळजी

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळण्याची भीती वाटते त्यामुळेच त्यांनी शिंदे यांचं लक्ष वेधण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन करत असल्याचं खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना डिवचले आहे. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांची ही सर्व धडपड कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी सुरू असल्याचा टोला देखील खैरे यांनी लगावला आहे. सत्तार हे सिल्लोडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणून शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यांचं शक्तीप्रदर्शन होऊ द्या. त्यानंतर आम्ही सिल्लोडमध्ये शक्तीप्रदर्शन करू'. असा इशारा देखील खैरे यांनी सत्तारांना दिला आहे. दरम्यान, आपण सत्तार यांच्या या शक्तीप्रदर्शनाला घाबरत नसल्याचं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; शिंदे गटात सामील झालेल्या खोतकरांचं मोठं विधान, म्हणाले.... 

असं असणार अब्दुल सत्तार यांचं शक्तीप्रदर्शन?

औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या पाचही आमदारांच्या वतीने औरंगाबाद विमानतळापासून सिल्लोड मतदारसंघापर्यंत मोठी रॅली काढण्यात येणार आहे. सिल्लोड मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या या शक्तिप्रदर्शनातून औरंगाबाद शिवसेनेतील बंडाची ताकद अधोरेखित केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी