बीड : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचं हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही असा खोचक टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे. राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना, भाजपमध्ये मोठ नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. त्याचबरोबर नाट्यावरून मोठा गोंधळ देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपने यावेळी देखील माजी मंत्री तथा नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावलले असल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.
अधिक वाचा : वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने आणलेल्या दोन मुलींची सुटका
उमेदवारी मिळाली म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काहीही बडबडत बसायचं, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. आमची इमानदारीची औलाद असून, बेमानीची औलाद नाही. तसेच भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात असही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : सिद्धू मूसेवालाचा मारेकरी संतोष जाधवला पुणे पोलिसांकडून अटक
दरम्यान, पुढे बोलताना विनायक मेटे म्हणाले की, आम्ही एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्या सोबत शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार असून कुणी असेल किंवा नसेल, असे मेटे म्हणाले.
अधिक वाचा : IPO असावा तर असा...102 रुपयांवरून 7200 रुपयांवर पोचला शेअर
आपणच आपल्या हक्काची आमदारकी आता २०२४ ला मिळवायची आहे. मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागायचं. त्यामुळे त्या दिशेने आपल्यलाल काम करायचं असल्याच म्हणत, मेटेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे.