बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून, बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांवर सडकून टीका केली आहे. यापूर्वी संदीप क्षीरसागर यांची तक्रार अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याच मेटे यांनी म्हटलं आहे. क्षीरसागर यांच्या अनेकांच्या तक्रारी माझ्याकडे आले आहेत. असंही मेटे म्हणाले. क्षीरसागरांनी महसूल विभागाला एक पत्र दिलं आहे. त्यात बीडमध्ये होत असलेल्या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीची माहिती मागवली आहे. आमदारांनीही माहिती मागवली. यामुळे बीडमध्ये सर्वसामान्य जमीन खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली. लोक भयभीत झाले आहेत. असंही मेटे म्हणाले.
अधिक वाचा : कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त
दरम्यान, पुढे बोलताना मेटे म्हणाले की, बीड जिल्ह्यातला आतापर्यंत सर्वात थर्डक्लास आमदार संदीप क्षीरसागर यांना बीड करांना जो त्रास झाला आहे, ते येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडची जनता दाखवून देईल. असंही मेटे यांनी म्हटलं आहे. दोन दिवसापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच समर्थक हे शिवसेनेमध्ये दाखल झाले. आणि याचं ५ जणानी संदीप क्षीरसागर यांना निवडून आणले होते असं मेटे म्हणाले.
अधिक वाचा : वीज कापल्याने भाजप आमदाराचा पारा चढला, कर्मचाऱ्याला शिवीगाळ
बीड शहरामध्ये जी काही विकास कामे सुरू आहेत, ती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी आणि पंकजा मुंडे यांनी मंजूर करून आणली आहेत. ही कामं व्हावीत यासाठी क्षीरसागर बंधू माझ्याकडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक वेळा येऊन बसायचे. त्यानंतर आम्ही फडणवीस साहेबांसोबत बैठका घेऊन ही काम मंजूर करून आणली. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय क्षीरसागर बंधु घेत असल्याचा आरोप देखील मेटे यांनी केला आहे. त्याचबरोबर आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये विकास कामावरून सुरू असल्याचं देखील मेटे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : शनि देव ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना फायद