'सध्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या या आमदाराला लागली लॉटरी'

shivena mla get house in mla quota from mhada : ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे.

shivena mla get house in mla quota from mhada
'सध्या शिंदे गटात सामील झालेल्या या आमदाराला लागली लॉटरी'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागली
  • या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते
  • संदीपान भुमरे हे सध्या शिंदे यांच्यासोबत गुवाहटीमध्ये आहेत

औरंगाबाद : ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. संदीपान भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. तसेच ते रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री देखील आहेत. औरंगाबादमधील म्हाडाच्या चिकलाठाणा येथील घरासाठी शुक्रवारी ऑनलाईन सोडत झाली. या सोडतीत मंत्री भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे.

अधिक वाचा : मुंबईत शिवसैनिक आक्रमक, बंडखोर आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने म्हाडाची मराठवाड्यातील बाराशे सदनिकांसाठी सोडत घेण्यात आली. यातूनच राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी देखील दोन टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतात. आज झालेल्या या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. दरम्यान, म्हाडातर्फे विविध गटासाठी काही सदनिका राखीव ठेवण्यात येतात. या राखीव कोट्यातून भुमरे यांना घर मिळाले आहे. म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी संदीपान भुमरे यांनी अर्ज केला होता. त्यानुसार भुमरे यांना एल-2,2,202 क्रमांकाचा प्लॉट लागला आहे. 

अधिक वाचा : मारुतीचा नवा 'ससा' तयार...नव्या अल्टो लेपिन एलसीची खासियत 

संदीपान भुमरे हे सध्या शिंदे यांच्यासोबत गुवाहटीमध्ये आहेत

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन गुवाहटी येथे गेले आहेत. या आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील देखील आमदार आहेत. ज्यामध्ये संदीपन भुमरे हे देखील आहेत. संदीपान भुमरे देखील शिंदे यांच्यासोबत गुवाहटीमध्ये आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले तर सातव्या माळ्यावरुन उडी मारु असं संदीपान भुमरे यांनी म्हटले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यासोबत भुमरे यांनी देखील बंडखोरी केली आहे. संदीपान भुमरे हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये संदीपान भुमरे देखील सामील झाले आहेत. याच संदीपान भुमरे याना आमदार कोट्यातून सरकारकडून घर घेण्याचा मोह आवरता आलेला नाही. आज जाहीर झालेल्या लॉटरीत लाभार्त्यांच्या यादीत संदीपान भुमरे यांचे आले आहे. 

अधिक वाचा ; सचिनच्या लेकीची घायाळ करणारी अदा,सारा तेंडुलकरचं नवं फोटोशूट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी