आता चंद्रकांत खैरेही 'या' कारणामुळे नाराज, म्हणाले

shivsena ex Mp and leader Chandrakat Khaire angry : याआधी सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे, यावेळी संघटना इतकी शांत कशी आहे? असा प्रश्न पत्रकारांनी खैरे यांना केला असता खैरे संतापलेले देखील पहायला मिळाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना खैरे म्हणाले की, 'आता काय मी जाऊन त्यांचे कार्यालये फोडू' असे म्हणत त्यांनी आजूबाजूला बसलेल्या सेनेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान खैरे यांनी टोचल्याचे पहायला मिळाले.

shivsena ex Mp and leader Chandrakat Khaire angry
आता चंद्रकांत खैरेही 'या' कारणामुळे नाराज, म्हणाले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकेकाळी आमदार-खासदार सोडा सादा नगरसेवक सुद्धा बंड करण्याची हिम्मत करत नव्हता
  • याआधी सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला व्यवस्थितपणे उभे केले आहे – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यात मोठी राजकीय घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील झाले आहेत. त्यामुळे, शिवसेनेची मोठी अडचण झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, एकेकाळी आमदार-खासदार सोडा सादा नगरसेवक सुद्धा बंड करण्याची हिम्मत करत नव्हता अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. शिवसेनेत निवडून येणाऱ्या लोकांनी बंड केल्यास त्यांना रस्त्यावर ठोकून काढा असा इशारा कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. असंही खैरे म्हणाले. मात्र आज औरंगाबादसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एकाचवेळी पाच आमदारांनी बंड केले असताना देखील शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर शांतता असल्याने खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 'आता काय मी जाऊन त्यांचे कार्यालये फोडू' असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत खैरे यांनी कान टोचले आहेत. 

अधिक वाचा : जुन्या पीएफ खात्यातील पीएफ नव्या खात्यात कसा ट्रान्सफर कराल

याआधी सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, याआधी सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे, यावेळी संघटना इतकी शांत कशी आहे? असा प्रश्न पत्रकारांनी खैरे यांना केला असता खैरे संतापलेले देखील पहायला मिळाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना खैरे म्हणाले की, 'आता काय मी जाऊन त्यांचे कार्यालये फोडू' असे म्हणत त्यांनी आजूबाजूला बसलेल्या सेनेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान खैरे यांनी टोचल्याचे पहायला मिळाले. खैरे यांनी औरंगाबादमध्ये रविवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. दरम्यान, खैरे यांनी असं म्हटल्यावर आता नेमकं कार्यकर्ते आक्रमक होतात की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.  

अधिक वाचा : आजारी शिक्षकाने सोनू सूदकडे मागितली मदत, मात्र झाला फ्रॉड 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला व्यवस्थितपणे उभे केले आहे – चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केला की, एकनाथ शिंदे यांनी चुकीचे कारण देऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी पुकारली आहे. हे बंड जास्त दिवस राहणार नाही. कारण मतदारांना पुन्हा एकदा या सर्व बंडखोरांना तोंड दाखवावे लागणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला व्यवस्थितपणे उभे केले आहे. कोणीही शिवसेनेचा आक्रमकपणा गेला असं कोणीही समजू नये. शिवसेनाही अजूनही आक्रमक असून वेळ आल्यास शिवसैनिक त्यांचा आक्रमकपणाही दाखवतील. शिवसेना ही मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली होती. असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

अधिक वाचा : राज्यातील राजकीय वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी