भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता, अब्दुल सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे - अर्जुन खोतकर

shivsena leader Arjun Khotkar on bjp : अर्जुन खोतकर यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी मोर्चादरम्यान, केलेल्या आरोपावर प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. त्याचबरोबर, हा मोर्चा पालिकेविरोधात नव्हता तर अर्जुन खोतकर यांना शिव्या देण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोपही खोतकर यांनी यावेळी केले आहेत.

shivsena leader Arjun Khotkar on bjp
भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता - खोतकर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ‘जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता - अर्जुन खोतकर
  • हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही – अर्जुन खोतकर
  • अब्दुल सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे?

उस्मानाबाद : भाजपकडून जालना शहरात काढण्यात आलेला ‘जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता असं वक्तव्य शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर, तर मोर्च्याला अवघ्या १५०० लोकं उपलब्ध असल्याचा दावा देखील अर्जुन खोतकर यांनी केला आहे. भाजपच्या वतीने जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात आज 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. या ‘जल आक्रोश’ मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला होता.

अधिक वाचा : जलआक्रोश मोर्चावेळी आला पाऊस अन देवेंद्र फडणवीस म्हणाले

हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही – अर्जुन खोतकर

अर्जुन खोतकर यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी मोर्चादरम्यान, केलेल्या आरोपावर प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. त्याचबरोबर, हा मोर्चा पालिकेविरोधात नव्हता तर अर्जुन खोतकर यांना शिव्या देण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोपही खोतकर यांनी यावेळी केले आहेत. गेली १० वर्ष सत्तेत असताना काय झाले. मुळात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपचा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला असंही खोतकर म्हणाले. भाजपचा मोर्चा म्हणजे फुसकाबार होता. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला असं खोतकर म्हणाले.

अधिक वाचा : घरातील कुटुंबप्रमुखाकडे हे गुण असणे खूप आवश्यक, वाचा सविस्तर 

अब्दुल सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे?

रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना उद्देशून सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करण्यासाठी सोडला असल्याचं म्हटलं होत. याला प्रतिउत्तर देताना खोतकर म्हणाले की, सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे असून, मी त्याचा निषेध करतो. तसेच सत्तार यांना औरंगजेब म्हणणे म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या लोकांचा अपमान असल्याचा सुद्धा खोतकर म्हणाले. 

अधिक वाचा : फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी