चंद्रकांत खैरे म्हणाले, 'असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार'

Shiv sena leader Chandrakant khaire on Shinde Group Mla : एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर खैरे यांनी  शिंदे गटावर जोरदार हल्ला करत खोचक टीका केला आहे.

Shivsena leader Chandrakant khaire on Shinde Group Mla
'असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार' - खैरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे
  • 'असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार'
  • उदय सामंत यांनी दिली चंद्रकांत खैरेंना ऑफर

औरंगाबाद : उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'शिंदे गटाच्या आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून येऊ द्या, त्यानंतर असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार' असा इशारा खैरे यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर खैरे यांनी  शिंदे गटावर जोरदार हल्ला करत खोचक टीका केला आहे. चंद्रकांत खैरे हे सतत शिंदे गटावर निशाणा साधत असताना आपल्याला पहायला मिळत असतात.

अधिक वाचा ; FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....

उदय सामंत यांनी दिली चंद्रकांत खैरेंना ऑफर

खैरेंनी आमच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला यावे, अशी ऑफर सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी दिलेल्या ऑफरला खैरे यांनी प्रतिउत्तर देतना खैरे यांनी 'शिंदे गटाच्या आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून येऊ द्या, त्यानंतर असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार' असं म्हटलं आहे. राज्यात आमचं सरकार येऊ दे पुन्हा सगळ्यांना घेऊन दर्शनाला येईन असा नवस कामाख्या देवीच्या दर्शनावेळी केला असल्याने आपल्या चाळीस समर्थक आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत . दरम्यान यावरून उद्योगमंत्री उदय सामंत आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एकेमकांवर आरोप केले जात आहे.

अधिक वाचा ; हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, त्वचा होईल चमकदार 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

उदय सामंत यांनी दिलेल्या ऑफरला उत्तर देतांना चंद्रकांत खैरे की, मी 22 वर्षांपासून कामाख्या देवीच्या दर्शनाला जात असतो. तसेच शिंदे गटाचे आमदार जाऊन आल्यावर देखील मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलो होतो. हे उदय सामंतांना माहित नाही, दरम्यान, मी जेव्हा कामाख्या देवीला गेलो होतो. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने पूजा केली आणि म्हणून यांचे निर्णय लांबले होते. त्यामुळे यांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून जाऊन तर येऊ द्या, त्यानंतर पहा मी कसा फटका मारतो. तिथे माझी अशी पूजा असेल की, तुम्ही आऊटचं होणार' असं खैरे म्हणाले. दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, मी आध्यात्मिकवादी असल्याने भक्तिभावाने सर्वचकडे पूजापाठ करत असतो. मात्र माझ्या धर्मासाठी, पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी जात असतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी