आता शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाणार, 'या' आमदाराने दिला इशारा

shivsena mla ambadas danve on Rebel mla : शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही. आता हळूहळू वेळ येत असून, या बंडखोर आमदारांना शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.  त्याचबरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडून खोटे आरोप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोट्या पद्धतीने जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहे.

shivsena mla ambadas danve on Rebel mla
आता शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाणार, 'या' आमदाराने दिला इशारा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बंडखोरांना 'शिवसेना स्टाईल'ने उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा शिवसेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिला
  • शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही – अंबादास दानवे
  • बंडाच्या यादीत भुमरे आघाडीवर आहेत हे सुद्धा तेवढच सत्य

औरंगाबाद : शिवसेना बंडखोर आमदारांना आता 'शिवसेना स्टाईल'ने उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा शिवसेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला आहे. दानवे यांनी पुढे बोलताना म्हटलं की, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आता या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावरील लढाई लढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासह बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांना परत येण्यासाठी दिलेली वेळ देखील संपली असल्याचं अंबादास दानवे यांनी दिला आहे. आता  उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत आकडेवारीसहित उत्तर देऊ असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला आहे.

अधिक वाचा : उन्हात टॅन होण्याची भीती असते, हे खा आणि मिळवा व्हिटॅमिन डी

शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही – अंबादास दानवे

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही. आता हळूहळू वेळ येत असून, या बंडखोर आमदारांना शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.  त्याचबरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडून खोटे आरोप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोट्या पद्धतीने जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना पक्षात राहता येणार नाही त्यांना इतर पक्षात जावे लागेल. असही आमदार अंबादास दानवे म्हणाले.

अधिक वाचा ; टाटा नेक्सॉनला आग लागण्याच्या घटनेनंतर सरकार करणार कारवाई 

बंडाच्या यादीत भुमरे आघाडीवर आहेत हे सुद्धा तेवढच सत्य

शुक्रवारी रात्री काही संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या फलकावर आणि भुमरे यांच्या फोटोला काळे फासले. कारण, बंडाच्या यादीत भुमरे आघाडीवर आहेत हे सुद्धा तेवढच सत्य आहे. त्यामुळे त्यांच्या याच बंडामुळे औरंगाबादमधील शिवसैनिक आक्रमक होतांना दिसत आहे. दरम्यान, भुमरे शिवसेनेत बंड करतील असे कुणालाही वाटले नव्हते. एवढच नाही तर त्यांच्या या निर्णयावर अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाही. स्लीप बॉय ते पाचवेळा आमदार असलेल्या भुमरे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती.

अधिक वाचा : अमेरिकेत सापडला 122 अंडी असणारा जगातील 'सर्वात मोठा अजगर'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी