मुंबई : शिंदे यांच्या तावडीतून सुटलेले आमदार कैलास पाटील हे दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप भूम परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे. तानाजी सावंत हे सध्या शिंदे यांच्या गटात आहेत. त्यांनी गुवाहाटी येथून एक व्हिडीओ जारी करत हा गंभीर आरोपी केला आहे. कैलास पाटील यांच्या जाण्याची व्यवस्था आम्ही केली आहे असं देखील तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : संजय राऊत यांची ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावली,
मतदानादिवशी दुपारी कैलास पाटील माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की, आपल्याला भाईना भेटण्यासाठी नंदनवन येथे जायचं आहे. मला या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या असंही सावंत म्हणाले. माझी तब्येत बरी नव्हती, कैलास पाटील यांनी म्हटल्यावर मी त्यांना म्हटलो की, आपण दोघे माझ्याच गाडीत जाऊ. त्यानंतर आम्ही दोघे नंदनवन येथे गेलो त्या ठिकाणी शिंदे यांच्याशी आमची चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यावर पाटील म्हणाले की, चला आता आपण निघू माझ्याकडे गाडी नाही तर आपल्याच गाडीमध्ये निघू असंही पाटील यांनी म्हटल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : हे 5 पदार्थ ठेवतात यकृताचे आरोग्य उत्तम, व्याधींपासून मुक्ती
दरम्यान, पुढे बोलताना सावंत म्हणाले की, कैलास पाटील मला म्हणाले की, ज्या ठिकाणी आता चर्चा झाली आहे त्या ठिकाणी आपल्याला निघायचे आहे. मी पाटील यांना चला म्हणालो आणि आम्ही गुजरातच्या दिशेने निघालो. पुढे जात असताना कैलास पाटील यांचे मोबाईल सुरु होता. साधारणतः आम्ही गुजराच्या चेक पोस्ट वरती आल्यानंतर कैलास पाटील मला म्हणाले की, साहेब इथ गाडी थांबवा मला लघुशंकेला जायचं आहे. त्यानंतर गाडी थांबवली आणि पाटील मला म्हणाले की, साहेब, थोड बाजूला या मला आपल्यासोबत चर्चा करायची आहे. मी कैलास पाटील यांना म्हणालो की, आता काय चर्चा करायची आहे. जी काय चर्चा करायची आहे, तूच मला सांगितले की, आपल्याला इकड जायचं आहे म्हणून आपण इकड आलो असं सावंत यांनी कैलास पाटील यांना म्हटलं असल्याचं सावंत यांनी दावा केला आहे.
अधिक वाचा ; अल्पसंख्यांक शाळांच्या अनुदानासाठी हा महिना आहे महत्त्वाचा
त्यानंतर कैलास पाटील यांनी तानाजी सावंत यांना परत जाण्यासाठी सांगितले, यावर तानाजी सावंत यांनी वापस जाण्यास नकार दिला असल्याच सावंत यांनी म्हटलं. तुम्ही जर परत जाणार असाल तर माझी गाडी घेऊन जा असंही सावंत यांनी कैलास पाटील यांना म्हणाले असल्याचं सावंत यांनी दावा केला आहे.
पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, कैलास पाटील हे मिडियाची जनतेची आणि सर्व जनतेची दिशाभूल करत आहेत. असा आरोप देखील तानाजी सावंत यांनी केला आहे.