कठीण काळात उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या शिवसेनेच्या 'या' आमदाराला मिळणार मोठं रिटर्न गिफ्ट

shivsena MLA ambadas danve will get a big return gift : मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नव्या दमाच्या अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. शिवसेनेने हा सेफ गेम केला असल्याचे देखील बोलले जात आहे, कारण याच पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेसने देखील दावा केला होता.

 shivsena MLA ambadas danve will get a big return gift
शिवसेनेच्या 'या' आमदाराला मिळणार मोठं रिटर्न गिफ्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली
  • उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र
  • विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लावावी - उद्धव ठाकरे

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मात्र, काही मोजकेच आमदार उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहिले. ज्यामध्ये एक आहेत ते म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील अंबादास दानवे. अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायमस्वरूपी राहिले. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या इमानदारीचे फळ त्यांना ठाकरेंकडून मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. आणि याच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेले आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लावावी अशा आशयाचं पत्र शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे.

अधिक वाचा : 'या' आमदारांना गेले फोन, BJPकडून पुन्हा पंकजाताईंना डच्चू?

उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नव्या दमाच्या अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. शिवसेनेने हा सेफ गेम केला असल्याचे देखील बोलले जात आहे, कारण याच पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेसने देखील दावा केला होता.

अधिक वाचा : ED सरकारने अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं, NCP ची टीका 

नेमकं काय आहे उद्धव ठाकरेंचं सभापतींना पत्र?

दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला आहे. या अधिकारानुसार मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस करत आहे. अशा आशयाचे पत्र उद्धव ठाकरे यांनी सभापतींना दिले आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड व्हावे यासाठी अनेक नेते तयार होते अशी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये, आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे हे देखील इच्छुक होते. मात्र, मराठवाड्यातील अंबादास दानवे हे आक्रमक स्वभावाचे आहेत. त्याचबरोबर फर्डी भाषणकला तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मोठा धक्का!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी