परभणी : परभणी जिल्ह्याचे ( parabhani District ) शिवसेनेचे खासदार संजय जाधव (Shivsena Mp Sanjay Jadhav) यांच्या गाडीचा भीषण अपघात ( major Accident ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खासदार संजय जाधव हे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. दरम्यानं, सदर अपघातात संजय जाधव यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. (shivsena MP Sanjay Jadhav Car Accident in parabhani )
अधिक वाचा ; मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स
जिल्हाधिकारी कार्यालयातील धोकादायक वळणावर खासदार संजय जाधव यांच्या गाडीचा अपघात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य तलाठी महासंघाचे पदाधिकारी राजू काजे आणि शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील धोकादायक झालेल्या वळणावर सदर अपघात घडला आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज नवरात्री निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी खासदार संजय जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात जात होते. यावेळी हा अपघात घडला आहे. दरम्यान, सदर अपघातात संजय जाधव यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना या अपघातात कुठलीही इजा झालेली नाही. मात्र तलाठी महासंघचे पदाधिकारी राजू काजे हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा ; Ind vs Aus: दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE?
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील वळण रास्ता हा अत्यंत धोकादायक झाला असून या ठिकाणी सतत अपघात होत असतात. मात्र संजय जाधव आणि राजू काजे यांच्या गाड्यांचा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
अधिक वाचा ; चमकदार,सुंदर त्वचेसाठी नक्की ट्राय करा बीटचा ‘हा’ फेसपॅक