Shivsena : शिवसेनेचे दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार, 'या', मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ

Soon two more MLAs will split from Shiv Sena : शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा खळबळजनक शिंदे गटातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे दावा केला आहे. संदीपान भुमरे यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे. नेमके ते दोन आमदार कोण? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

Soon two more MLAs will split from Shiv Sena
लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, या मंत्र्याचा दावा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील भुमरे यांचा खळबळजनक दावा
  • एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात - भुमरे
  • अंबादास दानवे यांनी लगावला भुमरे यांना खोचक टोला !

औरंगाबाद : शिवसेनेतील (shivsena) आणखी दोन आमदार फुटतील असा खळबळजनक शिंदे गटातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) दावा केला आहे. संदीपान भुमरे यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे. नेमके ते दोन आमदार कोण? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचा दावा यावेळी भुमरे यांनी केला आहे. दरम्यान, अगोदरच एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. यातच आता उद्धव ठाकरे (uddhav thakrey) यांच्यासोबत असलेले दोन आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या भुमरे यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संदीपान भुमरे यांनी म्हटल्याप्रमाणे जर शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटात सामील झाल्यास हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असू शकतो. अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्याचबरोबर अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन शिलेदार उद्धव ठाकरे याची साथ सोडणार, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : दिवसभर भूक लागते?, मग Craving कमी करण्यासाठी खा या 5 गोष्टी

संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमात खुर्च्या होत्या रिकाम्या

शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संदीपान भुमरे हे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले होते. संदीपान भुमरे यांच्या आयोजित कार्यक्रमाला मोठी गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मोठी गर्दी जमेल या आशेने भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे जोरदार नियोजन केले होते. मात्र, कार्यक्रमाची वेळ झाली तरी कार्यकर्ते आणि लोकं या कार्यक्रमाकडे फिरकत नव्हते. कार्यक्रमाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असल्याने  निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या या रिकाम्याच होत्या. त्यामुळे, सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता सुरु करण्यात आला. परंतु तरीदेखील गर्दी जमत नसल्याने आयोजक आणि कार्यकर्त्यांची मोठी दमछाक झाल्याचे पहायला मिळाले होते.

अधिक वाचा ; फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरच्या स्फोटात चिमुरडीचा मृत्यू 

अंबादास दानवे यांनी लगावला भुमरे यांना खोचक टोला !

संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने भुमरे यांच्यावर चांगलीच टीका केली असल्याचे पहायला मिळाले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील संदिपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ ट्विट केला होता. 'सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!' असं ट्विट विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.

अधिक वाचा ; कोरेगावमध्ये भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी