24 lakh fake students in maharashtra : धक्कादायक! राज्यात २४ लाख विद्यार्थी बोगस

24 lakh fake students in maharashtra : खासगी शाळा, मुख्याध्यापक, संस्था संचालक, भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने राज्यभरात अंदाजे २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा ब्रिजमोहन मिश्रा यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे

Shocking! 24 lakh froud students in the state
धक्कादायक! राज्यात २४ लाख विध्यार्थी बोगस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसेल असा त्यामागील उद्देश होता
  • अतिरिक्त मुख्य सचिवांनी पुर्नतपासणीचे आदेश दिले आहेत
  • ज्या शाळेत, वर्गात एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत त्यांचे आधार कार्ड चेक करून त्याची पडताळणी करण्यात येते

24 lakh fake students in maharashtra : औरंगाबाद : एका जनहित याचिकेद्वारे एक धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे. राज्यात थोडे थोडके नव्हे तर तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे. जनहित याचिकेद्वारे हा धक्कादायक असा दावा करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर जनहित याचिका हि औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आधारकार्डशी जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करणयाचे निर्देश दिले आहेत. ब्रिजमोहन मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. ब्रिजमोहन मिश्रा हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसेल असा त्यामागील उद्देश होता

खासगी शाळा, मुख्याध्यापक, संस्था संचालक, भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने राज्यभरात अंदाजे २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा ब्रिजमोहन मिश्रा यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. राज्यात गाजलेल्या बोगस पटपडताळणी प्रकरणानंतर ३ जुलै २०१५ रोजी राज्य शासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरळ प्रणालीचा वापर केला आहे. त्यात, शाळेतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी आधार कार्डद्वारे करण्यात आली. बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसेल असा त्यामागील उद्देश होता.

अतिरिक्त मुख्य सचिवांनी पुर्नतपासणीचे आदेश दिले आहेत

दरम्यान,  सदर प्रकरण हे अतिशय गंभीर असताना देखील या प्रकरणी कारवाई न करता अतिरिक्त मुख्य सचिवांनी पुर्नतपासणीचे आदेश दिले आहेत. त्यावर देखील या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील दोषींविरोधात फौजदारी कारवाई करावी आणि दंड लावावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार कोणत्या जिल्ह्यात किती बोगस विद्यार्थी?

परभणीमध्ये १५ हजार तर लातूरमध्ये ही १५ हजार विद्यार्थी संख्या बोगस असल्याचा दावा आहे

बीड जिल्यात १६,०६१ विद्यार्थी बोगस असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे

नांदेड जिल्यात ४५,००० हजार विद्यार्थी बोगस असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे 

ज्या शाळेत, वर्गात एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत त्यांचे आधार कार्ड चेक करून त्याची पडताळणी करण्यात येते

शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी २१ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन सर्व जिल्ह्यासाठी याबाबतची माहिती असलेली एक्सेल शीट देण्यात आली होती. त्यानुसार ज्या शाळेत, वर्गात एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत त्यांचे आधार कार्ड चेक करून त्याची पडताळणी करण्यात येते. शिवाय हे विद्यार्थी नेमके कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहेत याची शिक्षण विभागाच्या पथकामार्फत तपासणी केली गेली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी