बीड - धक्कादायक! परळीत 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा लावला बालविवाह

child marriage in Parli : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढल्याचे समोर आले आहे, दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलाय.

Shocking! A 16-year-old 10th class girl was forced into child marriage in Parli
बीड - परळीत 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा लावला बालविवाह 
थोडं पण कामाचं
  • परळी ग्रामीण पोलिसात मुलीच्या आई वडीलांसह एकूण  183 जणांवर गुन्हे दाखल
  • बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढल्याचे समोर आले आहे,
  • , दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलाय.

 child marriage in Parli, बीड, सुकेशनी नाईकवाडे : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढल्याचे समोर आले आहे, दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलाय. हा धक्कादायक प्रकार बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे.  (Shocking! A 16-year-old 10th class girl was forced into child marriage in Parli)

याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह, मुलाच्या आई- वडिलांवर त्याचबरोबर दोघांच्याही मामावर, फोटोवाल्यावर,  भटजीवर, आचार्यावर आणि मंडपवाल्यासह तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका 16 वर्षीय मुलीचा, गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला. 

बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासकीय यंत्रणा नंदागौळ ला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.

या प्रकरणी आता मुलीच्या आई- वडीलांसह मुलावर व त्यांच्या आई- वडिलांवर, मामा-मामीवर, भटजीवर, फोटोवाल्यावर, मंडपवाल्यावर, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणाऱ्या तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान यामुळं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या समस्येने डोकं वर काढल्याचं समोर आलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी