Shocking । बहिणीचे मुंडके धडावेगळे करणाऱ्या 'त्या' प्रकरणात नवा खुलासा, छाटलेल्या मुंडक्यासोबत सेल्फीही

Brother killed sister in aurangabad : हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. ज्या बहिणीने आपल्या हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले.

Brother killed sister in aurangabad
बहिणीचे मुंडके धडावेगळे करणाऱ्या 'त्या' प्रकरणात नवा खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आई आणि भावाने कीर्ती थोरे हिची घरी जाऊन हत्या केली
  • मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले
  • बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला

Brother killed sister औरंगाबाद : बहिण पळून जाऊन एखाद्या मुलाशी लग्न केल्याची माहीती होताच कुठल्याही भावाला बहिणीचा राग येणारचं हे खर आहे. मात्र, हा राग किती विकोपाला जाऊ शकतो याची प्रचीती औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. दरम्यान, बहिणीने पळून जाऊन प्रेम विवाह केल्याची माहिती भावाला समजताच भावाने चक्क बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या प्रकरण घडल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोळेगावात दोन दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान, या प्रकरणात पुन्हा एक मोठी माहिती समोर आली आहे. मयत तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. (Shocking Brother beheaded Sister in aurangabad selfie with trimmed head)

आई आणि भावाने कीर्ती थोरे हिची घरी जाऊन हत्या केली

दरम्यान, सदर प्रकरणात आईचा देखील हात असल्याची माहिती आहे. आई आणि भावाने कीर्ती थोरे हिची घरी जाऊन हत्या केली होती. कीर्तीचा सख्खा भाऊ संजय मोटे यांने कोयत्याने वार करत कीर्तीचे मुंडके छाटल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. बहिणीची हत्या करणारा भाऊ हा अल्पवयीन नसून त्याचं वय १८ वर्षे ६ महिने इतकं आहे.  त्यामुळे, आरोपी सज्ञान असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले

हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. ज्या बहिणीने आपल्या हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या करण्यात आलेल्या बहिणीचे नाव कीर्ती थोरे असं असून, कीर्तीने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे.

 

बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला

दरम्यान, भावाने बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला. लग्न केलेल्या बहिणीला भेटण्याच्या निमित्ताने भाऊ आणि आई रविवारी तिच्या घरी गेले होते. त्यावेळी बहीण चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन कोयत्याने सपासप वार करत भावाने तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झाले आहे. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावनेतून या दोघांनी ही हत्या केल्याची माहिती आहे. लेकीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आईने तिच्याशी संबंध तोडले होते. १९  वर्षीय तरुणीने ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री असलेल्या तरुणाशी विवाह केला होता.

अल्पवयीन नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

. ‘सैराट’ चित्रपटात ज्याप्रमाणे आर्चीची तिचा भाऊ प्रिन्स हत्या करतो, त्यावरुन प्रेरणा घेत भावाने ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अल्पवयीन नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तर आईला अटक केली आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी