धक्कादायक ! 'मृत्युनंतर आठ महिन्यांनी दिली कोरोनाची लस', नांदेडमधील धक्कादायक प्रकार

Shocking! Corona was vaccinated eight months after death : एका व्यक्तीचा कोरोनाने ८ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीला २९ डिसेंबर रोजी दुसरा डोस दिला असल्याची नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघड झाला

Shocking! Corona was vaccinated eight months after death
धक्कादायक ! 'मृत्युनंतर आठ महिन्यांनी दिली कोरोनाची लस'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उपचारादरम्यान २३ एप्रिल २०२१ रोजी झाला होता मृत्यू
  • आम्हा कुटुंबियांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ आरोग्य विभागाने केला - कुटुंबीय
  • मृतांना देखील डोस देवून लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना?

नांदेड : आरोग्य विभागाच्या तुघलकी कारभाराने जिल्ह्यात कळस अक्षरशः कळस गाठला आहे. एका व्यक्तीचा कोरोनाने ८ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीला २९ डिसेंबर रोजी दुसरा डोस दिला असल्याची नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघड झाला आहे. सदर घटनेने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री सतत कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे लसीकरणात गती आल्याचं दाखवण्यासाठी अशा प्रकारे मृतांना देखील डोस देवून लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल मयताच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित केला आहे. नांदेड जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लसीकरण वाढवण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत.

उपचारादरम्यान २३ एप्रिल २०२१ रोजी झाला होता मृत्यू

दरम्यान, ८ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शेतकरी हुलबा रामजी कोकणे असं असून, त्यांचे वय ७२ वर्षे होते. हुलबा कोकणे यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात २  एप्रिल २०२१ रोजी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर कोकणे कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे कुटुंबातील चार सदस्य उपचार घेत होते. मात्र , ७२ वर्षीय हुलबा कोकणे यांना देखील ताप, सर्दी,  खोकला असे कोरोनाचे लक्षण आढळून आल्यामुळे त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वय जास्त असल्याने ते आजारातून बाहेर येऊ शकले नाहीत. आणि त्यांचा उपचारादरम्यान २३ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला. कोकणे यांच्या मृत्युनंतर मोठा मुलगा मारोती कोकणे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे, मृत्यू झाल्यानंतर २९ डिसेंबर २०२१ रोजी दुसरा डोस देण्यात आला कसा? आणि दिला कोणी? तो कसा दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात किती प्रकार घडले असतील? याची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

आम्हा कुटुंबियांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ आरोग्य विभागाने केला

वडिलांचे निधन होऊन आठ महिने झाल्यानंतर बुधवारी २९ डिसेंबर २०२१ रोजी वडिलांनी दुसरा डोस घेतल्याचा मोबाईलवर संदेश व लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील मिळाले होते. ही बाब आम्हा कुटुंबियांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ आरोग्य विभागाने मांडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मयताच्या कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान, जेव्हा वडील पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा २३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मला देखील पॉझिटिव्ह असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी