Crime News धक्कादायक! खंडोबा मंदिरातील पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Shocking! Deadly attack on priests of Khandoba temple: उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील खंडोबा मंदिरातील पुजाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पुजारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पुजाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Shocking! Deadly attack on priests of Khandoba temple
धक्कादायक ! खंडोबा मंदिरातील पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अणदूर येथील खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
  • पुजाऱ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, गुरव समाजाची मागणी
  • किरकोळ वादातून गुरव समाजातील 10-12 पुजाऱ्यांना गावातील समाजकंटकांनी बेदम मारहाण केली

उस्मानाबाद  : उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) तुळजापूर तालुक्यातील (Tuljapur Taluka) अणदूर येथील खंडोबा मंदिराच्या (Khandoba temple) पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुजाऱ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 23 सप्टेंबर रोजी आंदोलन करून करण्यात आली आहे. तसेच गुरव समाजच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील घोटा (देवी) तुळजाभवानी संस्थानातील पुजारी गजानन किसन जगताप (गुरव) यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देखील गुरव समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (Shocking! Deadly attack on priests of Khandoba temple)

किरकोळ वादातून गुरव समाजातील 10-12 पुजाऱ्यांना गावातील समाजकंटकांनी बेदम मारहाण केली

अधिक वाचा : Ind vs Aus: दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE?


मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे श्री खंडोबाचे देवस्थान असून या मंदिराचे पुजारी वंश परंपरागत गुरव समाजाचे आहेत. गुरव समाजाने आज शैक्षणिक व आर्थिक प्रगती केल्यामुळे या गावातील काही समाज कंटक लोकांचा पोटशूळ उठला आहे. मागील 21 ऑगस्ट 2022 रोजी मंदिरात किरकोळ वादातून गुरव समाजातील 10-12 पुजाऱ्यांना गावातील समाजकंटकांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्याची तक्रार नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या भांडणाचे निमित्त करून गावातील काही लोकांनी मंदिरातील पुजाऱ्यांना व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांना लक्ष करीत आहेत. तसेच 50 ते 60 लोकांना एकत्र करून वारंवार निषेध मोर्चा काढून खोटे आरोप करून बदनामी केली जात असल्याचा आरोप गुरव समाजातील लोकांनी केला आहे. दरम्यान, खंडोबा देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा, मंदिरातील पुजाऱ्यांना हाकलून लावा, देवस्थानची शेती वाटून द्या अशा मागण्या वारंवार करून गुरव समाजाला वेठीस धरले आहे. त्यामुळे गुरव समाज गेल्या एक महिन्यापासून दहशतीखाली वावरत असल्याची माहिती देखील गुरव समाजातील मंडळीनी दिली आहे.

अधिक वाचा ; मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स 

गुरव समाजाची नाहक बदनामी करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी – आंदोलकांनी केली मागणी


दरम्यान, अणदूरच्या गुरव समाजाची नाहक बदनामी करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर मंदिरात दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी मंदिरात कायमस्वरूपी किमान 4 पोलिसांची नेमणूक करावी. तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान 10 पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा देवस्थान व गुरव समाजाची शेती पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी व पुजाऱ्यांचे मंदिरातून हाकलून लावण्याचे प्रयत्न करणाऱ्या विरोध कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

अधिक वाचा : Diabetes रुग्ण पोटभर खाऊ शकतात सीताफळ, फक्त...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी