बापरे ! चुलत भावाकडून साडेचार वर्षाच्या बहिणीवर अत्याचार

shocking ! Four-and-a-half-year-old sister raped by cousin : पिडीत साडेचार वर्षाची मुलगी ही घरात एकटीच असताना पिडीत मुलीचा चुलत भाऊ हा घरी आला आणि त्याने संधी साधून पिडीतेवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर तो तिथून निघून गेला यावेळी पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत असा प्रकार घडला आहे हे पिडीतेच्या आईच्या समजल्यानंतर तिच्या पायाखाली जमिनी सरकली.

shocking ! Four-and-a-half-year-old sister raped by cousin
बापरे ! चुलत भावाकडून साडेचार वर्षाच्या बहिणीवर अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • साडेचार वर्षाच्या मुलीवर चुलत भावाने केला अत्याच्यार
  • पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला
  • आईने दिलेल्या तक्रारीवरून नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

परभणी : राज्यात मुली, महिला या सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क चुलत भावानेच आपल्या बहिणीवर अत्याचार केला आहेः. घरी कोणी नसताना चुलत भावाने साडेचार वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना परभणी शहरातील मोची गल्ली येथे घडली आहे. दरम्यान, साडेचार वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार करणारा भाऊ देखील हा अल्पवयीनच आहे. तो देखील पंधरा वर्षाचा आहे. घरी कोणीही नसताना तो घरात आला आणि त्याने सदर कृत्य केलं आहे.

अधिक वाचा : स्विमिंग करून करा वजन कमी, तासात होत्यात एवढ्या कॅलरी बर्न

आईने दिलेल्या तक्रारीवरून नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

दरम्यान, सदर घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने अल्पवयीन १५ वर्षाच्या आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परभणी शहरातील नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भंडारा येथे मदतीच्या बहान्याने एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. भंडारा येथील घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्टात खळबळ उडाली असतानाच परभणी येथे घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यात महिला आणि मुलींवर घडत असलेल्या अशा घटनेने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

अधिक वाचा : 'आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी', राणेंची केसरकर टीका 

पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत साडेचार वर्षाची मुलगी ही घरात एकटीच असताना पिडीत मुलीचा चुलत भाऊ हा घरी आला आणि त्याने संधी साधून पिडीतेवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर तो तिथून निघून गेला यावेळी पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत असा प्रकार घडला आहे हे पिडीतेच्या आईच्या समजल्यानंतर तिच्या पायाखाली जमिनी सरकली त्यानंतर मुलीचीच्या आईने नानलपेठ पोलीस ठाणे गाठून अत्याचार करणाऱ्या नराधम चुलत भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नानालपेठ पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा ; तुमच्याकडे क्रेडिट कार्ड हे का? जाणून घ्या आणि नुकसान टाळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी