महाराष्ट्राला हादरवणारी घटना, फादर्स डेच्या दिवशी मुलाने केली वडिलांची हत्या, लातूर जिल्हयात २ घटना

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 21, 2020 | 22:52 IST

लातूर जिल्ह्यात फादर्स डेच्या दिवशी मुलानेच वडिलांचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लातुरात घडलेल्या हत्येमागचे कारण नेमके काय चला जाणून घेवूया.

Incidents shocking Maharashtra! On the day of Father's Day, the son removed the father's thorn, 2 incidents in Latur district
महाराष्ट्राला हादरवणारी घटना! पितृदिना दिवशीच मुलाने काढला बापाचा काटा ,लातुर जिल्हयात २ घटना  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • फादर्स डेच्या दिवशी जन्मदात्या पित्याचा खून
  • दोन्ही घटनेत शेतीचा वाद पित्यांना भोवला
  • भांडण सोडवण्यासाठी आलेले ४ जणांनाही मारहाण

लातूर: एकीकडे फादर्स डे (fathers day) निमित्त अनेकजण वडिलांना शुभेच्छा देत आहेत. तर लातूर जिल्ह्यात (latur district) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात (nilanga taluka) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फादर्स डेच्या दिवशी जन्मदात्या वडिलांचा मुलानेच खून (fathers murder) केल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

चाकूर तालुक्यातही घडला प्रकार

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात (chakur taluka) देखील असाच प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. फादर्स डेच्या दिवशी आणि पूर्व संध्येला  लातूर जिल्ह्यात जन्मदात्या पित्याच्या दोन घटना घडल्याने अवघा महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन्ही घटनेत शेतीचा वाद पित्यांना भोवला

लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन्ही हत्या ह्या पोटच्या मुलांनीच केल्या असल्याच्या समोर आल्या आहेत. एक निलंगा तालुक्यातील भोसलेवाडीत एक घटना घडली आहे. या घटनेत इतर चार जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरी हत्या हत्या फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातूर जिल्ह्यातील चाकूर या तालुक्यात घडली आहे. येथे मुलानेच जन्मदात्या वडिलांचा निघृणपणे खून केल्याचे उघड झाले आहे.

पेरणी सुरु केल्याचा राग

दरम्यान लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात राहत असलेल्या पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. यावर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने त्यांनी आपल्या शेतात पेरणी सुरु केली होती. मात्र पंचप्पा धुप्पाधुळे यांचा त्यांच्या मुलगा नागनाथ याच्यासोबत वाद होता. वडिलांनी शेतात पेरणी सुरु केली वाद विकोपाला गेला आणि वडिलांनी पेरणी सुरु केल्याच्या रागातून वडील पंचप्पा धुप्पाधुळे यांच्याशी पुन्हा भांडण झाले.

बायको आणि मेव्हण्यांनी दिली साथ

वडील पंचप्पा धुप्पाधुळे यांचे मुलगा नागनाथ याच्या सोबत भांडण होत असताना नागनाथ याची बायको आणि मेव्हणे यांनी देखील साथ दिल्याने पंचप्पा धुप्पाधुळे हे एकटे पडले. मुलगा नागनाथ याने वडिलांना रॉडने जबर मारहाण केली. दरम्यान मारहाणीत पंचप्पा धुप्पाधुळे यांचा मृत्यू झाला.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या ४ जणांनाही मारहाण

पंचप्पा धुप्पाधुळे यांना मुलगा जबर मारहाण करत असल्याचे पाहून ४ जण भांडण सोडवायला आले होते, या चारही जणांना मारहाण करण्यात आली असून, ते चार जण जखमी झाले आहेत. सदर जखमीवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचचार सुरु आहे.

सर्व आरोपी फरार

दरम्यान पंचप्पा धुप्पाधुळे यांचा मुलाने खून करून त्यांच्या सोबतीला असणारे इतर आरोपी फरार झाले आहेत. मुलगा नागनाथ याच्यासह इतर आरोपींवर निलंगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

चाकूरमध्येही प्रॉपर्टीसाठी वाद

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात देखील देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतीच्या वादातून चाकूर तालुक्यातील माजी पंचायत समिती सभापती असणाऱ्या चंद्रकांत मारापाल्ले यांची देखील स्वतःच्या मुलानेच प्रॉपर्टीसाठी हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी