औरंगाबाद : हातपाय बांधून तिघांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील बेलुरा येथे समोर आली. सुरुवातीला एकाने लॉजवर नेऊन नंतर गावी आल्यावर तिघांनी सदर पीडित विवाहितेवर बलात्कार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ११ एप्रिल रोजी गावातीलच अजय गवतेने अहमदनगर येथील एका लॉजवर नेऊन पीडितेवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेप्रकरणी सोमवारी चार जणांविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत.
अधिक वाचा ; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित होताच औरंगाबादेत जमावबंद
मिळालेल्या माहितीनुसार, बेलुरा येथील २४ वर्षीय पीडित विवाहित महिला ही पुण्यात वास्तव्याला असते. सुरुवातीला या महिलेवर अहमदनगर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला असून, नंतर १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गावातीलच दत्ता मुरलीधर गवते, परमेश्वर नारायण गवते व पप्पू ऊर्फ आकाश नरहरी गवते यांनी पीडितेला काटवाडी शिवारात नेऊन हातपाय बांधून पप्पू याने बलात्कार केला. नंतर तिघांनी पीडितेला मारहाण करत छेडछाड केली. सदर घटनेनंतर पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा पोलिसांसमोर वाचून दाखवला. पोलिसांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस सदर घटनेचा तापस पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही,११ जिल्ह्यांत ० रुग्ण
अधिक वाचा : भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटींचे हेरॉईन