Crime News : धक्कादायक ! फौजदारानेच केला १६ लाखाचा गुटखा गायब, पहा नेमकं काय घडलं

औरंगाबाद
Updated Jul 24, 2022 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking! police officer in beed stole gutkha worth 16 lakh सदर घटनेबाबत वरिष्ठांना करण्यात आलेल्या कारवाईबाबत संशय आला होता. त्यामुळे, या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेत तात्काळ सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे आदेश दिले होते. कुमावत यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन सर्व घटनेची माहिती घेतली असता यांना देखील संशय आला.

Shocking! Faujdar himself made Gutkha worth 16 lakhs disappear
धक्कादायक ! फौजदारानेच केला १६ लाखाचा गुटखा गायब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सहाय्यक पोलीस निरक्षकानेच पकडलेला गुटखा गायब केला
  • खाजगी कार्यालयात नेऊन त्यातून १६  लाख रुपये किमतीचे २३ पोते उतरवून घेण्यात आले
  • पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे दिले होते आदेश

Crime News : बीड : सहाय्यक पोलीस निरक्षकानेच पकडलेला गुटखा गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या चौकशीत सदर माहिती उघड झाल्याने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षकासह आणखी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. डी. बी. कोळेकर असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. डी. बी. कोळेकर यांच्यासह आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात तब्बल ३२ लाख रुपयाचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला होता. तो ट्रक कर्नाटकातून पाटोद्यामार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर गुटखा पकडणाऱ्या पाटोदा पोलिसांचा मोठं कौतुकही झालं होतं. मात्र पकडलेल्या याच गुटख्यातून तब्बल १६ लाख रुपयांचा गुटखा ठाणेप्रमुखानेच गायब केला. यानंतर, पोलीस अधीक्षकांच्या चौकशीनंतर समोर आले आहे.

अधिक वाचा ; राज्यात तब्बल 'एवढ्या' आत्महत्या, मराठवाड्याचा आकडा मोठा

खाजगी कार्यालयात नेऊन त्यातून १६  लाख रुपये किमतीचे २३ पोते उतरवून घेण्यात आले

केजेचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्याद्वारे कर्नाटकातून अहमदनगरला गुटखा जात असल्याची माहिती माहिती मिळाली होती. मिळालेली माहितीनुसार, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी २० जुलै रोजी पाटोदा पोलिसांना सदर ट्रकबद्दल माहिती देत कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या. कुमावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलिसांनी कारवाई देखील केली. ज्यामध्ये तब्बल ५० गुटख्याचे पोते पोलिसांना आढळून आले. परंतु, पोलिसांनी कंटेनर एका खासगी कार्यालयात घेऊन गेले. आणि त्याठिकाणी २३ पोते उतरवून घेण्यात आले. या पोत्यांची किंमत तब्बल १६ लाख रुपये इतकी आहे. आणि अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून घेत पंचनामा करताना २४ लाख ५७ हजारांचा गुटखा पकडण्यात आल्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा ; महिलांकडून पैसे आणि दागिने चोरणारी सिनियर सिटीझन गँग गजाआड 

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे दिले होते आदेश

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेबाबत वरिष्ठांना करण्यात आलेल्या कारवाईबाबत संशय आला होता. त्यामुळे, या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेत तात्काळ सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे आदेश दिले होते. कुमावत यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन सर्व घटनेची माहिती घेतली असता यांना देखील संशय आला आणि त्यांनी आरोपीकडून जप्त केलेल्या गुटख्याची चौकशी केली. यावेळी, केलेल्या कारवाईत आणि त्यांना संशय आला. कुमावत यांनी आपल्या चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला असता अधीक्षकांनी सहायक पोलीस निरीक्षक डी.बी.कोळेकर,पो.ना. संतोष क्षीरसागर,कृष्णा डोके यांच्यावर तडकाफडकी निलंबन केले आहे.

अधिक वाचा ; पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; कशी असेल सुविधा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी