10 hours full drama in Beed : "आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो" म्हणत बीडमध्ये शोले स्टाईल ड्रामा

10 hours full drama in Beed : धक्कादायक बाब म्हणजे महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र ती पतीपासून दूर राहते. मात्र, तरुण या महिलेवर प्रेम करत असल्याने तो तिला सोडायला तयार नव्हता

10 hours full drama in Beed
'आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत
  • मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले
  • आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो,  असा अट्टाहास या प्रेमी युगुलांने धरला

10 hours full drama in Beed बीड : अनेक सिनेमांमध्ये आपण पाहिलं असेल की, आपल्या प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी कुटुंबियांचा विरोध असतो. कुटुंबियांनी आपल्या लग्नाला मान्यता द्यावी यासाठी हिरो उंच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या घरच्यांची परवानगी मिळवतो. मात्र, बीड जिल्ह्यात अशीच एक सिनेस्टाईल घटना घडली आहे. कुटुंबातील लोकांकडून प्रेमाला आणि लग्नाला होत असलेल्या विरोधाला कंटाळून बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या कारणासाठी प्रेमी युगुलाने चांगलाच धिंगाणा घातला असल्याचं पहायला मिळालं आहे.  आम्हाला लग्नाला परवानगी दिली तरच आम्ही खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. सुमारे या प्रेमी युगुलांचा १० तास ड्रामा चालला. अखेरीस यामध्ये पोलिसांना पडावं लागलं आणि पोलिसांनी (Beed police) समजूत काढल्यानंतर हे प्रकरण रात्री उशीरा मिटले. (Shole Style 10 hours full drama in Beed couple climb water tank )

महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत

सदर घटनेत धक्कादायक बाब म्हणजे महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र ती पतीपासून दूर राहते. मात्र, तरुण या महिलेवर प्रेम करत असल्याने तो तिला सोडायला तयार नव्हता. या तरुणाचे आणि महिलेचे प्रेमसबंध हे हिंगोली येथे जूळले. तरुण हा बीड शहरातील असून, तो काही कामानिमित्त हिंगोलीला काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपला मुलगा एका महिलेच्या प्रेमात पडला असल्याची कुणकुण त्याच्या आई – वडिलांना लागली मात्र, महिला विवाहित असल्याने असल्याने मुलाच्या कुटुंबियांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधण्यात आले. दरम्यान रविवारी, हिंगोलीहून महिला बीडमध्ये आली. त्यानंतर हा सर्व ड्रामा सुरु झाला.

 

मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले

दरम्यान, महिला हिंगोली येथून तरुणांसाठी आली आणि दुपारी बारा वाजेपनंतर तरुण आणि महिला बीड शहराती अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले होते. आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे मुलाने घरी फोन करून सांगितले. मुलाचा फोन येताच कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. बघ्यांची गर्दी जमली. नगरसेवकही आले. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो,  असा अट्टाहास या प्रेमी युगुलांने  धरला होता. दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर ठिय्या मांडला. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अन शेवटी सर्वजण नमले आणि लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली. तेव्हा हे दोघे रात्री उशिरा खाली आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी