uncle rape nephew : काकाचं घृणास्पद कृत्य, पुतणीवरचं केला अत्याचार, पीडित पुतणी ५ महिन्याची गर्भवती

shooking! uncle rapes nephew in buldhana : आपल्या मुलीसोबत चुकीचा प्रकार घडल्याचं आईला कुणकुण लागली आणि आईने आपल्या लेकीला जवळ घेऊन नेमकं काय घडलंय याची विचारपूस  केली. आईने विचारातच पीडितेने टाहो फोडला. पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व घृणास्पद प्रकार आईला सांगितला.

shooking! uncle rapes nephew in buldhana
काकाचं घृणास्पद कृत्य, पुतणीवरचं केला अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीडिता गेल्या ११ महिन्यांपासून आपल्या काकाच्या घरी राहत होती
  • पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली
  • पीडिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती

uncle rape nephew : बुलडाणा : एका चुलत्याने आपल्या १५ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बुलडाणा (Buldhana) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात सदर घटना समोर आली आहे. चुलत्यानेचं पुतणीवर केलेल्या अत्याच्याराने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, काकाच्या या घृणास्पद कृत्यामुळे पीडिता पाच महिन्यांची गर्भवती देखील आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, आरोपी काका आपल्या पुतणीसोबत इतकं विकृत कसंकाय वागू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पीडिता गेल्या ११ महिन्यांपासून आपल्या काकाच्या घरी राहत होती

पीडितेचा काका तिला वडिलांसारखा जीव लावेल, तिची काळजी घेईल, असा विश्वास तिच्या आईला होता. म्हणून मोठ्या विश्वासाने पिडीतेला तिच्या आईने काकाकडे राहण्यासाठी सुपूर्द केलं होतं. आणि ती काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेली होती. सुमारे ११ महिन्यांपासून पीडिता आपल्या काकाच्या घरी राहत होती. मात्र, पीडितेच्या काकाने विश्वासघात करत असं संतापजनक कृत्य केलं. पीडिता गेल्या अकरा महिन्यांपासून आरोपी काकाच्या छळाला सामोरे जात होती. पीडिता घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी काकाने तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराबाबत कुणाला सांगितलं तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी नराधम काकाने दिली होती.

पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली

आईचे काम पूर्ण झाल्यावर ती आपल्या मुलीला आणण्यासाठी आपल्या मुलीकडे गेली आणि महिलेने आपल्या मुलीला घरी नेलं असता पिडीत मुलगी सतत नाराज दिसत होती. आपल्या मुलीसोबत चुकीचा प्रकार घडल्याचं आईला कुणकुण लागली आणि आईने आपल्या लेकीला जवळ घेऊन नेमकं काय घडलंय याची विचारपूस  केली. आईने विचारातच पीडितेने टाहो फोडला. पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व घृणास्पद प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या काकाने केलेल्या या घाणेरड्या कृत्याने आईच्या देखील पायाखालची जमीन सरकली. आणि आईने थेट आपल्या लेकीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. तिथे महिलेने आपल्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगत आरोपी काकाची तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल केला.

 

पीडिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती

पोलिसांनी तातडीने आरोपी काकाला बेड्या ठोकल्या. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. पण या घटनेने काका-पुतणीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. याशिवाय विश्वास नेमका कुणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलीस तक्रारीनंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल समोर आला तेव्हा पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती त्यातून समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी