[Video] पोलीस निरीक्षकाला राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पडले महागात

औरंगाबाद
Updated Feb 18, 2021 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

shree ram temple fund rally :१४ फेब्रुवारी रोजी हदगावमध्ये राम मंदिर निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली त्यावेळी ही ही घटना घडली आहे. राम मंदिर निधी संकलन कार्यक्रम रॅलीत सदर पोलीस निरीक्षक बंदोबस्तावर आले होते

shree ram temple fund rally
पोलीस निरीक्षकाला राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पडले महागात  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पोलीस निरीक्षकच डान्स करायला लागले म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले.
  • पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते
  • चौकशीअंती त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली

नांदेड :  अयोध्येत भव्य राम मंदिर (ram mandir) उभारण्यासाठी  सर्वसामान्य जनतेमधून निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, राम मंदिर निधी संकलन करत असताना (ram mandir donation) रॅलीत डीजे देखील लावण्यात आला होता. याच डीजे समोर अनेक मुल डान्स करत होती. मात्र, यामध्ये एका पोलीस निरीक्षकाला डान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. राम मंदिर संकलन रॅलीत नाचल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची घटना नांदेड जिल्ह्यात (nanded district) घडली आहे.

पोलीस निरीक्षकच डान्स करायला लागले म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले.

दरम्यान, सदर घटना ही नांदेड जिल्ह्यातील हदगाव या ठिकाणी घडली आहे. १४ फेब्रुवारी रोजी हदगावमध्ये राम मंदिर निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली त्यावेळी ही ही घटना घडली आहे. राम मंदिर निधी संकलन कार्यक्रम रॅलीत सदर पोलीस निरीक्षक हे बंदोबस्तावर आले होते. मात्र, बंदोबस्त असताना देखील डीजेच्या तालावर त्यांनी ठेका धरला. दरम्यान, पोलीस निरीक्षकच यांनीच ठेका धरल्यानंतर कार्यकर्त्यांनीही त्यांना उचलून खांद्यावर घेतले. आणि ते नाचू लागले. यावेळी कोणीतरी पोलीस निरीक्षक डान्स करत असलेला व्हिडीओ शूट केला. आणि तो  व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सदर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड असे आहे.

पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते

पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी राम मंदिर निधी संकलन रॅलीत डान्स केलेला व्हीडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंत याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हनुमंत गायकवाड यांची तक्रार वरिष्ठाकडे केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांचा जागी लक्ष्मण राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड (police inspector hanumant gaikwad) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार

विश्व हिदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आणि राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी माहिती दिली आहे की, अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार आहे. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम जन्मभूमी मुक्त झाली असून, त्या जागी मंदिराचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राम मंदिर उभा करण्यासाठी सर्वत्र निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरु असून, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात राम मंदिर उभारणीसाठी निधी देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी