'या' गावात 6 वाजता वाजतो सायरन आणि टीव्ही, मोबाईल होतात बंद

Sirens sound at 6 o'clock in 'this' village and TV, mobile phones are turned off ; उमरगा तालुक्यातील जकुरवाडी येथील युवा सरपंच अमर सूर्यवंशी यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णय घेतला आहे. गावातील विद्यार्थी मोबाईल आणि टीव्हीमुळे अभ्यास करत नसल्याने अमर सूर्यवंशी यांनी सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत गावातील टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Sirens sound at 6 o'clock in 'this' village and TV, mobile phones are turned off
'या' गावात 6 वाजता वाजतो सायरन आणि टीव्ही, मोबाईल होतात बंद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणून सरपंचाने घेतला वेगळा निर्णय
  • सहा ते आठ ही वेळ मुलांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आली
  •  दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते

उस्मानाबाद : प्रत्येक व्यक्ती टीव्ही आणि मोबाइलमध्येचं गुरफटून चालला आहे. टीव्ही आणि मोबाइलमुळे माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या आयुष्यावर देखील मोबाईल आणि टीव्हीमुळे मोठा परिणाम होत आहे. आणि हिच बाब लक्षात आल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकुरवाडी येथील सरपंचाने एक वेगळा निर्णय घेतला असून, दररोज मुलांसाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

अधिक वाचा ; म्हणून पतीने केलं पत्नीचं टक्कल, सोलापुरातील धक्कादायक घटना

सहा ते आठ ही वेळ मुलांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आली

उमरगा तालुक्यातील जकुरवाडी येथील युवा सरपंच अमर सूर्यवंशी यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णय घेतला आहे. गावातील विद्यार्थी मोबाईल आणि टीव्हीमुळे अभ्यास करत नसल्याने अमर सूर्यवंशी यांनी सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत गावातील टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सूर्यवंशी यांनी एक भोंग्याचा आवाज देऊन नंतर मोबाईल बंद करावा अशा सूचना गावातील लोकांना दिल्या आहेत. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. मुले तास-तास मोबाइलला चिकटून असतात. त्यामुळे अभ्यासाकडे होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असल्यामुळे सूर्यवंशी यांनी थेट गावात 2 तास मोबाईलबंदी केली आहे.

अधिक वाचा ; महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करणार - लोणीकर 

 दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते

दरम्यान, दररोज टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोगा लावण्यात आला आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून सूर्यवंशी यांनी गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून हा सर्वावर परिणाम करणारा माध्यमातून सूचना दिली जात आहे. ग्रामीण भागात मुलांना अभ्यासाची सवय लागावी. तसेच टिव्ही व मोबाइलसारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना आपले टीव्ही, मोबाइल, रेडिओ, लाउड स्पीकर सर्व बंद करायचे व सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे. अशी सूचना आपोआप मिळते. सायरनचा आवाज आला की, विद्यार्थी लगेच आली टीव्ही आणि मोबाईल बंद करतात आणि लगेच अभ्यासाला बसतात.

अधिक वाचा : Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे,त्वचा होईल मुलायम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी