sister and brother died । बहीण-भावाचा भाऊबीजेच्या आदल्या दिवशी अपघातात मृत्यू

औरंगाबाद
Updated Nov 05, 2021 | 19:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

sister and brother died in the accident : मामा राजू खिलारे यांच्यासोबत आदर्श सूर्य वय ९ वर्षे आणि कीर्ती सूर्य वय ८ वर्षे राहणार विरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरविंद सूर्य यांची ही दोन मुले गावी जात होती.

sister and brother died in the accident
बहीण-भावाचा भाऊबीजेच्या आदल्या दिवशी अपघातात मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्याच भाऊबीज असताना आज या दोन भावंडांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे
  • वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ झाला बहिण – भावाचा अपघात 
  • नशीब बलवत्तर म्हणून मामा राजू खिलारे (२४) हे या अपघातातून वाचले

sister and brother died । हिंगोली : दिवाळीचा सण आला की, सर्वजन हा सण आनंदात साजरा करतात. दिवाळीच्या सणाला प्रत्येकाच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असत. मात्र, अशावेळी कुठली दुखद घटना घडली की ती घटना मात्र, कधीच विसरलीही जात नाही हेही तितकंच खर. दरम्यान, अशीच एक दुखद घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे.  दिवाळीच्या काळात मामाच्या गावी जाणाऱ्या भावा बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऐन भाऊबीजेच्या आदल्या दिवशीचं अशी घटना घडल्याने हिंगोली जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे. 

वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ झाला बहिण – भावाचा अपघात 

मामा राजू खिलारे यांच्यासोबत आदर्श सूर्य वय ९ वर्षे आणि कीर्ती सूर्य वय ८ वर्षे राहणार विरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरविंद सूर्य यांची ही दोन मुले गावी जात होती. मात्र, मामाच्या गावी जात असताना वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ अचानक समोरून टाटा मॅजिक पिकअप क्रमांक एम एच २२ ए ए १६२० ला जोरदार धडक दिली आणि या धडकेत या धडकेमध्ये बहिण – भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, सदर अपघात हा अतिशय भयंकर होता. नशीब बलवत्तर म्हणून मामा राजू खिलारे (२४) हे या अपघातातून वाचले असले तरी ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. ही घटना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाटा मॅजिक पिकप चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर मामा राजू खिलारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

उद्याच भाऊबीज असताना आज या दोन भावंडांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे

या घटनेची माहिती मिळताच राजू खिलारे यांचे गाव महिपाल पिंपरी आणि कीर्ती व आदर्श यांचे गाव विरेगाव या गावामध्ये शोककळा पसरली आहे. मामा राजू खिलारे हा त्याच्या भाचा आणि भाचीला त्याच्या गावी म्हणजेच महिपाल पिंपरी या गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. परंतु वाटेतच काळाने घाला घातला. या घटनेमुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उद्याच भाऊबीज असताना आज या दोन भावंडांचा अपघातात मृत्यू झाल्याने प्रचंड दुःख व्यक्त केले जात आहे. सदर घटनेचा वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी