घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड सोबत मिळणार 'या' सुविधा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 10, 2021 | 19:20 IST

special ward of Mucormycosis patient created in Aurangabad government hospital :रुग्णांना महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध मोफत दिले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड
special ward of Mucormycosis patient created in Aurangabad government hospital  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • घाटी रुग्णालयात एकूण ९० म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार
  • राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय
  • म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दर निश्चित

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव देखील गमावला असून, आता कोरोना पाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसिस सारखा रोग आला असून या रोगामुळे देखील अनेकांना आपला जीव गमवण्याचा धोखा निर्माण झाला आहे. म्युकरमायकोसिस या रोगामुळे डोळ्यासारखा अवयव देखील निकामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असलायचे पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी याच कारणामुळे शहरातील घाटी रुग्णालयात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या वॉर्डची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज १० जून रजी पाहणी केली आहे. (special ward of Mucormycosis patient created in Aurangabad government hospital )

घाटी रुग्णालयात एकूण ९० म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार

औरंगाबादेत आतापर्यंत सुमारे एक हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात कोरोनाचा असलेला प्रादुर्भाव कमी झाला असला तरी म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. रुग्णांना महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध मोफत दिले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. सध्या घाटी रुग्णालयात एकूण ९० म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार केला जात आहे. तर आतापर्यंत एकूण १०० जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगितले होते. म्युकरमायकोसिस या आजारावर बोलताना राजेश टोपे यांनी ८ जून रोजी ही मोठी घोषणा करण्यात आली होती. “म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. याचा विचार करून राज्य शासनाने सदर घोषणा केली होती. त्यामुळे या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना याची खबरदारी घेण्यात यावी असे सांगत प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांनी याबाबत दक्ष राहून काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या होत्या. 

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दर निश्चित

काही खासगी रुग्णालयांची या आजारावर उपचार करण्यासाठी जनआरोग्य योजनेत नोंद झालेली नाही. मात्र, तरीही अशा खासगी रुग्णालयात या आजारावर रुग्ण उपचार घेत असेल तर या रुग्णालयांसाठीही उपचाराची दरनिश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार नाही, याचीही दक्षता घ्या असे निर्देशही त्यांनी दिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी