SSC HSC Result 2022 Process Update : दहावी बारावी निकालाची लगबग

SSC HSC Result 2022 Process Update Teachers Submitting Checked Answer Sheets In Board Office : औरंगाबाद विभागात पेपर तपासणी अर्थात उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढला आहे. पेपर तपासणारे आपापल्या तपासलेल्या उत्तरपत्रिका कार्यालयात जमा करू लागले आहेत.

SSC HSC Result 2022 Process Update Teachers Submitting Checked Answer Sheets In Board Office
दहावी बारावी निकालाची लगबग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहावी बारावी निकालाची लगबग
  • औरंगाबाद विभागात पेपर तपासणी अर्थात उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढला
  • सुरुवातीला औरंगाबाद विभागात वेळमर्यादा पाळली जात नसल्याचे चित्र होते

SSC HSC Result 2022 Process Update Teachers Submitting Checked Answer Sheets In Board Office : औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल लागण्यास औरंगाबाद विभागामुळे दिरंगाई होणार असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विभागाला फैलावर घेतले. याचे परिणाम दिसू लागले आहेत. औरंगाबाद विभागात पेपर तपासणी अर्थात उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढला आहे. पेपर तपासणारे आपापल्या तपासलेल्या उत्तरपत्रिका कार्यालयात जमा करू लागले आहेत.  शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात धांदल उडाली आहे. अचानक कामाची लगबग वाढली आहे.

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत तर बारावीची परीक्षा १४ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत झाली. यानंतर पेपर तपासणीचे काम सुरू झाले. राज्यातील इतर विभागांमध्ये पेपर तपासण्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले पण औरंगाबाद विभागात दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचा वेग इतर विभागांच्या तुलनेत कमी होता. यामुळे निकाल जाहीर होण्यास दिरंगाई होणार अशा स्वरुपाची वृत्त येण्यास सुरुवात झाली. ही वृत्त आल्यानंतर शिक्षण विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांनी औरंगाबाद विभागाला फैलावर घेतले. याचे परिणाम दिसू लागले. पेपर तपासण्याचा कामाचे वेग वाढला. 

औरंगाबाद विभागात सोमवार ११ एप्रिल, मंगळवार १२ एप्रिल आणि बुधवार १३ एप्रिल या तिन्ही दिवशी तपासलेल्या उत्तरपत्रिका कार्यालयात जमा करण्यासाठी गर्दी होती. औरंगाबाद विभागात दहावी बारावी परीक्षेला तीन लाख ५४ हजार ७२३ विद्यार्थी बसले होते. उत्तरपत्रिकांची संख्या ३५ लाखांपेक्षा अधिक आहे. संबंधित विषयाचा पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून २१ दिवसांत विभागीय कार्यालयात जमा करणे अपेक्षित असते. सुरुवातीला औरंगाबाद विभागात ही वेळमर्यादा पाळली जात नसल्याचे चित्र होते. पण आता औरंगाबाद विभागातील कामाचा वेग वाढल्याचे दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी