बीडमध्ये मोठा अपघात, तब्बल 'एवढ्या' जणांचा मृत्यू , फोटो पाहून अंगाचा थरकाप उडेल !

st bus accident in beed : सदर अपघात हा आज सकाळी झाला आहे. लातूर-अंबाजोगाई रोड वर बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

st bus accident in beed
बीडमध्ये मोठा अपघात , तब्बल 'एवढ्या' जणांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत , तर सहा जणांचा मृत्यू झाल आहे
  • लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला
  • दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा

बीड : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण आहे. हिंगोली, बीड, औरंगाबाद , उस्मानाबाद आणि लातूरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता बीडमध्ये एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात (major accident in Beed) झाला आहे.

लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला

सदर अपघात हा आज सकाळी झाला आहे. लातूर-अंबाजोगाई रोड वर बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. तर, लातूर औरंगाबाद ही बस लातूर येथून निघाली होती. बस आणि ट्रकचा समोरसमोर अपघात झाला ज्यामध्ये बसची एक बाजू पूर्णपणे ट्रकला धडकली. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा

दरम्यान, सदर अपघात हा नेमका नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी