तुळजाभवानी मंदिरासमोर जोगवा मागून एस टी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन ,जोगव्यात जमा झालेली रक्कम सी एम फंडात जमा करण्याचा निर्धार

st worker protest in osmanabad : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तुळजापूर आगारातील कर्मचारी यांनी एस टी डेपो ते तुळजाभवानी देवीचा शहाजी राजे प्रवेश द्वार पर्यंत जोगवा मागो आंदोलन केले

st worker protest in osmanabad
तुळजाभवानी मंदिरासमोर जोगवा मागून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जोगव्यात जी काही रक्कम जमा झाली आहे ती सी एम फंडात जमा करण्याचा निर्धार
  • संप चालू ठेवता येणार नाही
  • एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन

st worker protest in osmanabad  उस्मानाबाद :  तुळजाभवानी मंदिरा समोर जोगवा मागून एस टी कर्मचारी यांनी केले अनोखे आंदोलन केले राज्यभर गेली अनेक दिवसापासून एस टी कर्मचारी ही शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी आंदोलन करत आहे पण शासनाने पगार वाढ करण्याचा निर्णय घेत हे आंदोलन माघे घेण्याचे आवाहन केले असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मचारी मात्र आंदोलन करण्याचा भूमिका वर ठाम असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तुळजापूर आगारातील कर्मचारी यांनी एस टी डेपो ते तुळजाभवानी देवीचा शहाजी राजे प्रवेश द्वार पर्यंत जोगवा मागो आंदोलन केले आहे.

जोगव्यात जी काही रक्कम जमा झाली आहे ती सी एम फंडात जमा करण्याचा निर्धार

 दरम्यान, आंदोलन केलेल्या कर्मचाऱ्यांनी जो जोगवा मागितला आहे त्या जोगव्यात जी काही रक्कम जमा झाली आहे ती सी एम फंडात जमा करण्याचा निर्धार केला असून आता तरी राज्य शासन विलनिकर्णाचा निर्णय घेईल व आई तुळजाभवानी त्याच्या डोक्यात हा निर्णय घेण्यास सद्बुद्धी दे अशी प्रार्थना देवी चरणी केली आहे.

संप चालू ठेवता येणार नाही

पगारवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर अनिल परब म्हणाले की, न्यायालयाने  विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज अकरा वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन

एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या १५  दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने १२ आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल, तो राज्य सरकारला मान्य असेल, असं अनिल परब यांनी म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी