ST Worker Suspended । एसटी कामगारांविरोधात मोठी कारवाई, तब्बल एवढे कर्मचारी करण्यात आले निलंबित

औरंगाबाद
Updated Nov 09, 2021 | 19:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

st worker suspended in nanded and other bus depo।; संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

st worker suspended in nanded and other bus depo
एसटी कामगारांविरोधात मोठी कारवाई , 'एवढे' कर्मचारी निलंबित   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे.
  • मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन
  • ४५ आगरांमधील १६ विभागातील ३७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली

st worker suspended  । पुणे  : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्या घेवून आंदोलन करत आहे. एसटी कामगार यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील बससेवा बंद आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणारे अनेक प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने  हे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मात्र, एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने वेगवेगळे कारण देत राज्यातील ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ४५ आगरांमधील १६ विभागातील ३७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

काल ९० टक्के कामगार हजर नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान, 'जिथे रस्ता, तिथे एसटी' अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज दुसऱ्या दिवशीही एसटी रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आजही राज्यभरात एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन

दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते.

 

या आगारातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आली कारवाई

सांगली जिल्ह्यातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाडी आगारातील ५८, नांदेडमधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर या आगारातील ५८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट आगारातील ४०, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील ५७, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी