टाइम्स नाऊ मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, राज्यमंत्री बनसोडेंनी दौरा बदलला, आधी शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Oct 17, 2020 | 08:28 IST

state minister sanjay bansode osmanabad tour : राज्यमंत्री संजय बनसोडे प्रथम शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा अगोदर करणार असल्याने टाइम्स नाऊ मराठीने दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे.

state minister sanjay bansode osmanabad tour
राज्यमंत्री बनसोडेंनी दौरा बदलला, अगोदर शेतीच्या नुकसानीची पाहणी   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • टाइम्स नाऊ मराठीने बातमी दाखवताच बनसोडेंच्या दौऱ्यात बदल
  • अगोदर करणार शेतीच्या नुकसानीची पाहणी
  • पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी- अनिल बोंडे

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे (rain) शेतकऱ्यांचे (farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सत्ताधारी पक्षातील कुठल्याच मंत्र्याने बांधावर जाऊन केली नाही असा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे(state minister sanjay bansode) यांनी देखील उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा (osmanabad district tour) आखला होता. दरम्यान संजय बनसोडे यांचा दौरा १७ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. मात्र संजय बनसोडे यांच्या नियोजित दौऱ्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नियोजित वेळ ही सर्वात शेवटी होती. मात्र टाइम्स नाऊ मराठीने सदर बातमी दाखवताच बनसोडे यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. दरम्यान संजय बनसोडे प्रथम शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीच्या पाहणीचा दौरा अगोदर करणार आहेत.

असा आहे संजय बनसोडे यांचा नवीन दौरा

सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी लातूर येथून मोटारीने लोहारा येथे प्रयाण. ९ वाजून ३० मिनिटांनी मौजे करजखेडा येथे अतिवृष्टीने झालेल्या पिकांची व भागांची पाहणी. १० वाजून ३० मिनिटांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन. ११ वाजता कार्यकर्ता बैठक. दुपारी १२ वाजता लोहारा तालुक्यातील विविध विषय व प्रश्नाबाबत तालुकास्तरीय आढावा बैठक. १ वाजता लोहारा येथून मोटारीने औसाकडे प्रयाण. १ वाजून ४५ मिनिटांनी जयराज जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी २ वाजता औसा येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण.

पूर्वीचा संजय बनसोडे यांचा दौरा?

संजय बनसोडे हे दौऱ्याच्या सुरुवातीलाच ते लोहारा येथील पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर कार्यकर्ता बैठक त्यानंतर लोहारा तालुक्यातील आढावा बैठक, त्यानंतर डाळिंब येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यानंतर एका कार्यकर्त्याच्या घरी भेट आणि सर्वात शेवटी जाता जाता नुकसान झालेल्या पिकांची पाहणी ते करणार आहेत. मात्र संजय बनसोडे हे शेतकऱ्यांना आपल्या दौऱ्यात सर्वात शेवटी भेटणार असल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली होती.

पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी- अनिल बोंडे

अनिल बोंडे म्हणाले, पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी देखील अनिल बोंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी कोराडवाहूला २५ हजार आणि बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत कराव अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली. दरम्यान त्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी यावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी