उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत अजब प्रकार पहायला मिळाल्याचे समोर आले आहे. खासदार आणि आमदार यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा घेण्यात येत होता. मात्र यावेळी अधिकारी चक्क मोबाईलवर व्यस्त होते.
अधिक वाचा : आयपीएल हक्कांद्वारे बीसीसीआयच्या तिजोरीत 46,000 कोटींची भर
कोणी रेसिपी पाहत होते. तर, कोणी फेसबुक पाहण्यात व्यस्त होतं. तर, याहून कहर म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधीक्षक अभियंता सुनीता पाटील तर कँडी क्रश गेम खेळण्यात व्यस्त असल्याचं पहायला मिळाले.
अधिक वाचा : एनपीएसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ही मोठी सुविधा
दरम्यान, जिल्हा जिल्ह्यात विविध विकास कामे राबवण्यात येत आहेत. मात्र ती कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक सुरू होती मात्र याचे गांभीर्य येथील अधिकाऱ्यांना नसल्याचे सदर बैठकीत दिसून आले.
अधिक वाचा : पाच हवं काम; 9 लाख बँक कर्मचारी 27 जूनला असणार संपावर