Student Suicide : विद्यार्थिनीने केली 'नीट' परीक्षेच्या एक दिवस आधीच आत्महत्या, कुटुंबीय म्हणाले.....

Student commits suicide a day before 'NEET' exam : ऋतुजा शिंदे ही आभ्यासाला वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तिचे वडील हे  रात्रपाळीसाठी कामाला गेले होते. वडील शनिवारी सकाळी घरी परतले असता ऋतुजा खाली आली नाही हे लक्षात येताच तिचे वडील वरच्या मजल्यावर गेले असताना त्यानंतर ऋतुजाने गळफास घेतल्याचे समोर आले. परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला असून नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Student commits suicide a day before 'NEET' exam
विद्यार्थिनीने केली 'नीट' परीक्षेच्या एक दिवस आधीच आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नीट परीक्षा एक दिवसावर असतांना एका तरुणीने केली आत्महत्या
  • शुक्रवारी रात्री जेवणानंतरही ऋतुजाने आईजवळ बसून अभ्यास केला
  • परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज

Student Suicide :औरंगाबाद : नीट परीक्षा एक दिवसावर असतांना एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋतुजा गणेश शिंदे असं सदर तरुणीचे नाव असून, ऋतुजा शिंदे ही विध्यार्थिनी १८ वर्षाची होती. ऋतुजा शिंदेने बारावीत चांगले गुण मिळवले होते. बारावीत चांगले गुण मिळाल्यानंतर दिलेल्या पहिल्या नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने ऋतुजाने पुन्हा एकदा तयारी सुरू केली होती. परंतु एक दिवसावर असतांना मध्यरात्री अभ्यासाच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना शनिवारी समोर आली आणि ऋतुजाच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. ऋतुजा शिंदे जयभवानीनगर, मुकुंदवाडी या मूळ गावाची रहिवासी होती.

अधिक वाचा ; महाराष्ट्रातील आणखी आमदार फुटणार, शिंदे गटात सहभागी होणार?

शुक्रवारी रात्री जेवणानंतरही ऋतुजाने आईजवळ बसून अभ्यास केला

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिंदे ही अतिशय हुशार होती. ऋतुजा ही छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाली होती.  १२ वीच्या परीक्षेत देखील तिला चांगले गुण ८८ टक्के गुण मिळाले होते. गेल्यावर्षी दिलेल्या नीटच्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्याच काळात तिला कोरोना झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर तिने नव्या उमेदीने नीटचा अभ्यास सुरू केला होता. मात्र, या परीक्षेत तिला यश मिळाले नाही. मात्र, ती खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने नीट परीक्षेच्या तयारीला लागली होती. दरम्यान, तिने रविवारी नीटची परीक्षा होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री जेवणानंतरही ऋतुजाने आईजवळ बसून अभ्यास केला. त्यानंतर घरातील वरच्या मजल्यावरील तिच्या खोलीत निघून गेली आणि तिने आत्महत्या करून टोकाचे पाऊल उचलले.

अधिक वाचा ; पत्नीने जवळ झोपण्यास दिला नकार,संतप्त पतीने केलं असं काही की 

परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज

ऋतुजा शिंदे ही आभ्यासाला वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तिचे वडील हे  रात्रपाळीसाठी कामाला गेले होते. वडील शनिवारी सकाळी घरी परतले असता ऋतुजा खाली आली नाही हे लक्षात येताच तिचे वडील वरच्या मजल्यावर गेले असताना त्यानंतर ऋतुजाने गळफास घेतल्याचे समोर आले. परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला असून नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत.

अधिक वाचा : महाराष्ट्रातील 'या' शिवमंदिरात नंदीविना विराजमान आहेत महादेव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी