Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

Success in the 509-day-long crop insurance battle : जोपर्यंत उर्वरित 330 कोटी तसेच 2021 च्या खरीप हंगामातील 388 कोटी रुपये भरपाई कंपनीकडून आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरकारकडून 282 कोटी रुपये प्राप्त होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे.

Success in the 509-day-long crop insurance battle
509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला यश   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उर्वरित 330 कोटी रुपयांची साधी मागणीही कंपनीकडे नोंदविण्यात आली नाही. - आमदार पाटील
  • आमदार कैलास पाटील यांनी उपोषण केल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढली
  • शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होतायेत जमा

उस्मानाबाद : खरीप हंगाम 2020 मध्ये अतिवृष्टी होऊन जिल्हाभरात पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर विमा कंपनी जुजबी कारणे समोर करून भरपाई देत नसल्याने 10 जून 2021 रोजी उच्च न्यायालयात सर्वात पहिल्यांदा याचिका दाखल करून कायदेशीर लढ्याला सुरुवात केली होती. दीर्घ संघर्षानंतर येथे आपला पहिला लढा यशस्वी झाला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील  (Mla kailas Patil ) यांनी दिली आहे. (Success in the 509-day-long crop insurance battle)

अधिक वाचा  : या सेलिब्रिटींनी स्वीकारली आहे व्हेगन लाइफस्टाइल, पाहा फायदे

‘या’ कारणामुळे आपण उपोषणाचे अस्त्र उगारले – आमदार कैलास पाटील

दरम्यान पुढे बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत कंपनीला चपराक दिली. मात्र, तरी देखील याचा बोध न घेतलेल्या कंपनीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. याठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने 200 कोटी जमा करण्याचे आदेश कंपनीस देऊनच सूनवण्यांना सुरुवात केली. पुढे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने देऊन सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. यानंतर विहित मुदतीत सुमारे 531 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयात जमा असलेले 200 कोटी रुपये कंपनीने दिलेल्या पहिल्या यादीतील 1,69,086 शेतकऱ्यांनाच वाटण्याचा घाट घालण्यात आला. उर्वरित 330 कोटी रुपयांची साधी मागणीही कंपनीकडे नोंदविण्यात आली नाही. यामुळेच आपण उपोषणाचे अस्त्र उगारले होते असं देखील आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, अशी घ्या काळजी

आंदोलन सुरू करताच शेतकरी संख्या वाढली

आंदोलन सुरू करताच शेतकरी संख्या 1,84,413 ने वाढून ती 3,53,499 वर गेली. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता वितरित होत असलेल्या 201 कोटी रुपयांतील हिस्सा मिळत आहे. आंदोलन सुरू केल्यावरच उर्वरित 330 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कंपनीवर कार्यवाही सुरू झाली. सातव्या दिवशी शासन व प्रशासन झुकले असून, लागलीच जमा असलेले 201 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली. आजपासून ते प्रत्यक्ष खात्यावर वितरित होत आहेत. हे आपल्या 509 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या लढ्याचे अंशत: यश आले असल्याचं आमदार पाटील म्हणाले.

अधिक वाचा ; गुजरातमधील पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणार भारताचे नागरिकत्व

 

282 कोटी रुपये प्राप्त होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार

दरम्यान, जोपर्यंत उर्वरित 330 कोटी तसेच 2021 च्या खरीप हंगामातील 388 कोटी रुपये भरपाई कंपनीकडून व अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून 282 कोटी रुपये प्राप्त होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी