Beed Accident: बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ट्रकला भीषण अपघात, 20 ते 25 कामगार जखमी

Maharashtra News: बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 ते 25 कामगार जखमी झाले आहेत. 

sugarcane worker truk accident in majalgaon beed district of maharashtra news in marathi
बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ट्रकला भीषण अपघात, 20 ते 25 कामगार जखमी 
थोडं पण कामाचं
  • ऊसतोड कामगारांच्या ट्रकला अपघात
  • अपघातात 20 ते 25 कामगार जखमी
  • जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल

सुकेशनी नाईकवाडे, बीड

Sugarcane worker truck accident in Beed: बीडच्या माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्याजवळ ऊसतोड कामगारांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने कर्नाटककडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 20 ते 25 ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना माजलगाव, बीड, परभणी, औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हे पण वाचा : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आपल्या गावी जात होते. माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाटा येथे सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या ट्रकला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये वीस ते पंचवीस ऊसतोड कामगार जखमी झाले.

हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

कविता संतोष राठोड विरगव्हाण मंठा, वर्षा बाळु राठोड हांडी जिंतुर, शालु शिवाजी चव्हाण विरगव्हाण मंठा, शरद लिंबा चव्हाण करणावळ मंठा, लक्ष्मी शरद चव्हाण करणावळ मंठा, या जखमीवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर जखमींवर बीड, औरंगाबाद, परभणी येथे उपचार सुरू असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय विजयसिंह झोनवाल यांनी सांगितले. 

हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश खटकळ, नवनाथ गोरे ,उबाळे, पोटे, असेवार इत्यादी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी