औरंगाबाद : अधीक्षक अभियंता पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने चावट पणाचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना औरंगाबादमधील महावितरण कार्यालयातील आहे. सदर अधिकारी हा सहकारी अधिकारी महिला या कार्यालयात आल्यावर तो त्याच्या कक्षात टेबलवर ठेवलेल्या एका स्टीलच्या नग्न मूर्तीवर हात फिरवायचा. त्याचबरोबर तो चुकीच्या पद्धतीने देखील अधिकारी महिलांकडे पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवीण मारोतीराव दरोली असं ५१ वर्षीय अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे. प्रवीण दरोली या अधिकाऱ्यावर आता त्याने केलेल्या अश्लीश कृत्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. कारण, महिलांनी अधीक्षक अभियंत्याच्या नेहमीच्या कृत्याला वैतागून थेट पोलीस ठाणे गाठले आहे. महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभियंत्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : यावर्षीचा मुंबईतला पहिला गोविंदाचा मृत्यू, दोन दिवसांची झुंज
मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता हा कार्यालयातील कुठल्याही महिला अधिकाऱ्याकडे वाईट नजरेने बघत होता. त्याचबरोबर अभियंता दरोली यांच्या कॅबिनमध्ये एक स्टीलच्या धातुची नग्नवस्थेतील मूर्ती टेबलावर ठेवलेली असायची. कार्यालयातील सहकारी महिला कामानिमित्ताने कॅबिनमध्ये गेल्यास दरोली हा महिलांना वाईट नजरेने पाहून त्या नग्न मूर्तीवर अश्लील रित्या हात फिरवायचा. हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू होता. अशी माहिती त्याच्या सोबत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. महिला अधिकारी हे सतत होत असलेल्या अभियंत्याच्या अश्लील कृत्याला कंटाळले होते. अखेर त्यांनी पोलीसाकडे केलेल्या तक्रारीमुळे अभियंत्याचे बिंग फुटले आहे. सदर अधीक्षक अभियंता दरोली हा शहरातील गारवारे मैदानाजवळ महावितरणचे अधीक्षक अभियंता ग्रामीण मंडळ कार्यालय आहे. त्यामध्ये तो अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याच कार्यालयात फिर्यादी महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक वाचा : 'या' भन्नाट अवतारात पाणी पुरी खायला गेली पूनम पांडे
दरम्यान, फिर्यादी अधिकारी महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिने म्हटले आहे की, मला दररोज काही न काही कामाच्या निमित्ताने दरोली यांच्या कार्यालयात जावे लागायचे. कार्यालयात गेल्यानंतर अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली हा सतत अश्लील कृत्य करायचा. कामानिमित्ताने कॅबिनमध्ये गेल्यास दरोली हा महिलांना वाईट नजरेने पाहायचा आणि टेबलावर ठेवलेल्या नग्न मूर्तीवर अश्लील रित्या हात फिरवायचा. हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू होता. असंही फिर्यादी महिलेने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी फिर्यादी अधिकारी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा ; हनुमानाला प्रसन्न करण्याचे Best उपाय, चमकेल भाग्य