Supriya Sule अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या शिवीनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....

Supriya sule frist reaction on abdul sattar controversial remark on her ; एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  विरोधकांवर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला आहे.

Supriya sule frist reaction on abdul sattar controversial remark on her
सत्तार यांनी दिलेल्या शिवीनंतर सुळे यांची पहिली प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरली अगदी खालच्या पातळीची भाषा
  • अब्दुल सत्तार यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानावर "मी यावर भाष्य करणार नाही" - सुप्रिया सुळे
  • माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल – अब्दुल सत्तार

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा खासदार  (Supriya Sule) यांना शिवी दिली असून, सत्तार यांनी दिलेल्या शिविनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झाली असल्याचे पहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेली भाषा ही अगदी खालच्या पातळीची असून, सत्तार यांनी माफी मागत आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, यावर आता स्वत: सुप्रिया सुळे यांची भूमिका समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानावर "मी यावर भाष्य करणार नाही," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; मारुतीच्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार

नेमकं काय म्हणाले कृषिमंत्री अब्दुल सत्तार?

आज औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या होणाऱ्या सभेचा आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार हे आले असता, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  विरोधकांवर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असल्याचे या मुलाखतीत समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असली तरी सुळे यांनी या वक्तव्यावर काही भाष्य करणार नसल्याचे म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Virat Kohli:टी20 वर्ल्डकपदरम्यान विराट कोहलीसाठी मोठी खुशखबर 

माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल – अब्दुल सत्तार

मी जी भाषा वापरली त्यावर मी ठाम आहे, माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असली तरी सत्तार हे माफी मागणार नसल्याचे सिद्ध होत आहे. ज्याच्या ज्याच्या तोंडामध्ये खोके येतात त्यांचं डोकं तपासावं लागेल. काही लोकांना रात्री स्वप्नातही खोकी दिसतात. असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी