"तुम्हाला भाऊ अन दादा असा वापरलेला शब्द टोचत असेल तर शिवीवाचक शब्द सुचवावा" : सुषमा अंधारे

Sushma Andhare on Sanjay Shirsath: सुषमा अंधारे या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यंच्यावर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare comments on sanjay Shirsath read in marathi
"तुम्हाला भाऊ अन दादा असा वापरलेला शब्द टोचत असेल तर शिवीवाचक शब्द सुचवावा" : सुषमा अंधारे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला भाऊ अन दादा असा वापरलेला शब्द टोचत असेल तर शिवी वाचक शब्द सुचवावा- सुषमा अंधारे
  • संजय शिरसाट यांच्यावर मी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे
  • महिलांविषयी अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवर मुख्यमंत्री महोदय काय कारवाई करणार? - सुषमा अंधारे

सुकेशनी नाईकवाडे, बीड

Sushma Andhare PC: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या बीड दौऱ्यावर असून यांनी बीड जिल्ह्याच्या परळी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत बोलताना सुषमा अंधारेनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जातीच्या कार्डचा मी वापर करत नाही तर लोकांनी जातीबाबत मला विचारण्यास सुरु केले. मी मुख्य प्रवाहात बोलतेय म्हणून अनेक कारण समोर ठेऊन मला ट्रोल करण्यात येत असल्याचे सुषमा अंधारेंनी म्हटलं.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत म्हणून मी कोणालाही एकेरी भाषेत बोलत नाही. अजितदादांना दादा म्हणूज बोललो तर त्यांना ते टोचत नाही, आर आर पाटील यांना आबा म्हणून बोललो तर त्यांनाही त्याचे काहीच वाटत नाही मात्र संजय शिरसाटांना मी भाऊ म्हटलं तर त्यांना ते खूप लागले. मला माहीत नाही भाऊ म्हणून बोलणं त्यांना टोचत असेल. 

हे पण वाचा : हे उपाय करा अन् डास चावल्यावर येणारी खाज पळवा

अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील हे महिलांबद्धल गल्लीच्छ भाषा वापरून महिलांच्या बाबद असे अभद्र बोलत आहेत. त्याबाबद मुख्यमंत्री महोदय या त्यांच्या मंत्र्यांवर काय कारवाई करणार ? असा सवाल ही सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

तुम्हाला भाऊ अन दादा असा वापरलेला शब्द टोचत असेल तर शिवी वाचक शब्द सुचवावा अशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. आता संजय शिरसाटांवर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल ही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हे पण वाचा : 6 सेकंदात Google शोधून दाखवा, 95 टक्के होतात फेल

शीतल म्हत्रेंच्या बाबत हे सरकार काहीच करत नाही, तर एका लहान मुलास अटक करून कारवाई केल्याचे दाखवले आहे. याबद्धल मी स्वतंत्र बोलणार असल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 

त्या पुढे म्हणाल्या की, मग हे सगळं कुभांड का रचलं जात आहे? तर माझ्यावर कुठलेही ब्यागेज नाही, मी बाई पणाच कुठलेही कार्ड खेळणार नाही, ना माझ्यावर ईडीची कारवाई झाली नाही म्हणून मला कशाची भीतीच नाही. फक्त विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचण्यासाठी मी त्यांच्यावर तक्रार दाखल करत आहे असे ही सुषमा अंधारे म्हणल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी