उस्मानाबाद : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काल रात्री उपोषणाला बसलेल्या आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांची भेट घेतली. यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत विश्वासघात झाला असल्याचं म्हणत बच्चू कडू यांना मंत्रीपद द्यायला हवं होत असं अंधारे यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या संपर्कात किती आमदार आहेत, हे त्यांनाच माहिती. मात्र, प्रेम भंगाचं दुःख त्यांना झालं आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. त्यांना काहीच किंमत राहिली नाही, त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. हे वाईट केलं, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; करा हे घरगुती उपाय, या Natural हेअर पॅकने केस होतील काळे
दरम्यान, पुढे बोलताना अंधारे यांनी म्हटलं आहे की, बच्चू कडू हे स्वाभिमानी असून त्यांनी त्यात हिंदुत्वसाठी तडजोड केली आहे. त्यांनी आपला स्वाभिमान देखील गहाण ठेवला असल्याचं अंधारे यांनी म्हटलं. बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं, असं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या. दरम्यान, अंधारे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की सत्तेचा कैफ जास्त झालेले लोक काहीही बोलू शकतात. तसंच हे लोक बोलत आहेत. हा कल्प आणि दर्प आहे. आदित्य ठाकरे यांनी या सर्वांना सळो की पळो करुन टाकलं आहे. आम्ही त्यांच्या टीकांना सकारात्मक घेतो. मात्र, ते ठाकरे यांची दखल घेतात. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त हे चार उपाय
उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे तात्काळ मिळावे या मागणीसाठी उपोषण करत आहेत. ऐन दिवाळी सणात आमरण उपोषण करावे लागते आहे हे क्लेशदायक आहे. बहीण म्हणून त्यांची पाठराखण करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हा लढा राज्यातील शेतकऱ्यांचा आहे, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊनही उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, मोदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या पुढची कोणती यंत्रणा केली ते सांगावे. असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी विचारला.
अधिक वाचा ; मुंबईतील कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी, तिघांचा जागीच मृत्यू