'सरकार उंटावरून शेळ्या हाकतय' स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 20, 2020 | 19:33 IST

अभिषेक याही घराची परस्थिती अत्यंत हलाकीची असून, तो उसतोड आणि शेतकरी कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांकडे अवघी एक ते दीड एकर जमीन आहे. अभिषेक हा शिक्षणासाठी हॉस्टेलला राहत होता.

Swabhimani farmer Sanghatana made demand
'सरकार उंटावरून शेळ्या हाकतंय' स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • ऑनलाइन शिक्षणाचा घाट घालणे बंद करा स्वाभिमानीची मागणी
  • ग्रामीण भागात विजेजा तुटवडा
  • अभिषेकला मागे राहण्याची भीती भेडसावत होती

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील शाळकरी मुलाने आत्महत्या केली आहे. या मुलाच्या वडिलांनी ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब घेऊन दिला नाही या कारणामुळे त्याने टोकाचे पाउल उचलत आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अभिषेक संत असे आहे. अभिषेक संत हा गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे येथील राहणारा आहे. दरम्यान अभिषेक याच्या आत्महत्येनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब घेऊन द्यावेत अशी सरकारकडे मागणी देखील केली आहे.

काय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी सरकारवर निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या की, सरकार उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या मुलांना वंचित ठेवायचं की काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खरच राज्य सरकारला ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरु करायची आहे तर त्याआधी त्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. गावामध्ये मोबाइल नेटवर्क असले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलाकडे टॅब असला पाहिजे. गावात २४ तास वीज असली पाहिजे.

ऑनलाइनचा शिक्षणाचा घाट घालणे बंद करा

पूजा मोरे यांनी सरकरला ऑनलाइनचा घाट घालणे बंद करा म्हणत त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करा आणि त्यानंतरच ऑनलाइन शिक्षण सुरु करा अस म्हंटल आहे. जर हे असंच सुरू राहीलं तर अनेक मुलं आत्महत्या करतील याची सर्वस्व जबाबदारी राज्य सरकार आणि मंत्री वर्ष गायकवाड यांची असेल अस पूजा मोरे यांनी म्हंटल आहे.

अभिषेकला मागे राहण्याची भीती भेडसावत होती

आत्महत्या केलेल्या अभिषेक संत याच्या अनेक मित्रांकडे टॅब होता. मात्र आपल्याकडे टॅब नसल्याने आपण मागे राहतो कि काय अशी भीती अभिषेक याला सतावत होती. त्यामुळे त्याने वडिलांकडे टॅब घेण्यासाठी तगादा लावला होता. मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर पैसे नसल्याने वडिलांनी त्याला पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो अस म्हटलं होत, मात्र निराश झालेल्या अभिषेकने थोडाही विचार न करता टोकाचे पाउल उचलत आत्महत्या केली.

अभिषेक शिक्षणासाठी हॉस्टेलला राहायचा

अभिषेक याच्या घरची परस्थिती अत्यंत हलाकीची असून, तो उसतोड आणि शेतकरी कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांकडे अवघी एक ते दीड एकर जमीन आहे. अभिषेक हा शिक्षणासाठी हॉस्टेलला राहत होता. त्याला शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हायचं होत. त्यासाठी त्याने वडिलांकडे मागणी केली होती. मात्र घराची हलाकीची परस्थिती असल्याने वडिलांनी पेरणी झाल्यावर टॅब घेवून देतो अस म्हंटल होत. मात्र त्याने न ऐकता टोकाचे पाउल घेत आत्महत्या केली आहे.

या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण नाही

सरकराने ऑनलाइन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांच्या देखील मतांचा विचार केला गेला आहे. दरम्यान ६ ते ७ वयोगटातील पहिली आणि दुसरीला असणारे विध्यार्थी हे लहान असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या वर्गातील मुलांना दररोज एक तास तर त्यापुढील विध्यार्थ्यांना दररोज २ तास ऑनलाइन शिक्षण दिले जाणार असल्याचे राज्याच्या शाळेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी