बीड : नातेवाईकाच्या लग्नासाठी जाणारी स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, स्विफ्ट कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. कारमधील प्रवाशी हे पुण्याहून केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे लग्नासाठी जात होते.
अधिक वाचा ; पाणी प्यायल्याची दलित विद्यार्थ्याला शिक्षा, मारहाणीत मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, स्विफ्ट कार आयशर टेम्पोच्या खाली घुसली. ही स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. कार आयशर टेम्पोच्या खाली घुसल्याने गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठा वेळ लागला आहे. घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते तात्काळ दाखल झाले. यानंतर गाडीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं गेलं. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात असताना गाडीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
अधिक वाचा ; अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत
दरम्यान, स्विफ्ट डिझायर गाडी ही आयशर टेम्पोखाली घुसल्याने आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. जेव्हा गाडीतील लोकांना बाहेर काडण्यात आले त्यावेळी लोकांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते. सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अधिक वाचा ; Megablock : बाहेर जाण्याआधी पाहा लोकल रेल्वेचं Timetable