Accident News दोन कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

swift car and wagnor collision, four killed in aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव गावाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्विफ्ट आणि वॅगनार कारमध्ये हा अपघात झाला असून, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

swift car and wagnor collision, four killed in aurangabad
दोन कारचा भीषण अपघात, पहा अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव गावाजवळ एक भीषण अपघात घडला
  • या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
  • हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव गावाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्विफ्ट आणि वॅगनार कारमध्ये हा अपघात झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातातील स्विफ्ट कार औरंगाबादमधील बजाज नगर येथील तर वॅगनार कार अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, अपघातानंतर मृत आणि जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. काही वेळानंतर दोन्ही गाड्यांना बाजूला करण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्यात आला होता.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर

असा घडला अपघाताचा थरार?

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  हा अपघात नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. एका स्विफ्ट कारमधून 5 ते 6 काही लोक नगरकडून औरंगाबादच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आदळली. यावेळी मोठा आवाज देखील झाला होता. दरम्यान,या अपघातात बजाज नगर येथील स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातातील सर्व जखमी आणि मृत व्यक्तींना तात्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले.

अधिक वाचा : इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या 

अशी आहेत मृत आणि जखमी व्यक्तींची नावे

रावसाहेब मोटे, सुधीर पाटील, महानगर रतन बेडवाल यांच्यासह एका व्यक्तीचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर शशीकला कोरट, सिध्दांत जंगले, छाया हेमंत  जंगले आणि शकुंतला जंगले राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नेवासा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून, मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

अधिक वाचा ; मत मांडा ! Data Protection Billवर सरकारला हव्यात प्रतिक्रिया

अधिक वाचा ; वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर व्हा सावध...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी