राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा प्लीज, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला - संभाजीराजे छत्रपती संतापले

Take the Governor out of Maharashtra - Sambhaji Raje was furious : पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Take the Governor out of Maharashtra - Sambhaji Raje was furious
राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा -संभाजीराजे संतापले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे
  • माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला
  • पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला - संभाजीराजे छत्रपती

परभणी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

अधिक वाचा ; Pune railway: आज ड्युटी संपवून वीकेंडला फिरायला जाताय?

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी?

दरम्यान, राज्यपाल यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही जेव्हा शिकत होतो, तेव्हा आम्हाला विचारलं जात होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सांगायचो की, सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो पहायला मिळतील, ‘शिवाजी तर जुने झाले आहे’. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला, यावेळी राज्यपाल यांनी हे विधान केलं आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते.

अधिक वाचा ; पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? मोठ्या टिप्स 

पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे – राज्यपाल

पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं की, 'तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी असल्याचं देखील कोश्यारी यांनी म्हटलं आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही' असंही राज्यपाल म्हणाले होते.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर

अधिक वाचा ; जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा केसची रहस्य उलगडण्याची शक्यता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी