tanaji sawant targeted mp omaraje nimbalakar उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुपत असलेला वाद आता मात्र, चव्हाट्यावर आला आहे तो पण थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतचं. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि पालकमंत्री शंकरराव गडाख यांना भूम – परंडा – वाशीचे आमदार डॉ तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत धारेवर धरले होते. त्यामुळे, सत्ताधारी पक्षातचं एकमत नसल्याचे उघड झाले असून, आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने चांगलीच पालकमंत्री गडाख आणि ओमराजे निंबाळकर यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, ७ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीत बिलाच्या मुद्यावरून खासदार ओमराजे यांच्यात चांगलीच शाब्दिक जुंपली असल्याची माहिती आहे. महावितरणची थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५ कोटी रुपयांची कामे प्रशासकीय मान्यता न घेता केल्याने त्याचे बिल अदा करू नये असा पवित्रा सावंत यांनी घेतला होता. मात्र, खरा प्रश्न हा आहे की, प्रशासकीय मान्यता नसताना देखील महावितरणची कामे कोण केली? ठेकेदार कोण? यासह अन्य मुद्दे बैठकीत चर्चेली गेली आहेत. त्याचबरोबर महावितरणची कामे प्रशासकीय मान्यता नसताना करणारे ठेकेदार कोण? त्यांना कोणाचे पाठबळ ? याची चर्चा होत आहे. महावितरणची बिले अदा केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देखील तानाजी सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे सत्ताधारीच लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करत असल्याने जनतेने आपले गऱ्हाणे कोणाकडे करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार सावंत यांच्या मतदारसंघात १ कोटी ८० लाख रुपये देण्यात आले त्याचबरोबर इतर कामात ही निधीचे वापट कमी- जास्त केले असल्याचं सावंत यांनी उघड केलं असल्याने लोकसंख्याच्या तुलनेत सम समान वाटप करण्याचे ठरले आहे.
यापुढे चुका होणार नाहीत याची काळजी घ्या, प्रत्येक गोष्ट कारवाई किंवा बिले अडवून करता येणार नाही, असं म्हणत पालकमंत्री गडाख यांनी आपली जुनी पद्धत वापरत विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर आमदार कैलास पाटील यांनी मौन धारण करणे पसंद केले.
आमदार सावंत यांची ओमराजे निंबाळकर आणि गडाख यांच्यासोबत खडाजंगी होत असताना उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी मात्र, मौन बाळगले होते. दरम्यान , यापूर्वी देखील अशा घटना घडल्या होत्या त्यावेळेस देखील कैलास पाटील यांनी मौन बाळगले होते. हा देखील चर्चेचा विषय आहे.