[VIDEO] तुळजापूर-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला, सिलेंडरचा स्फोट, वाहतूक विस्कळीत

औरंगाबाद
Updated Feb 11, 2020 | 20:43 IST

सोलापूर तुळजापूर रस्त्यावर तामलवाडी टोलनाक्याजवळ घरगुती गॅस टाक्या घेऊन जाणारी गाडीला आग लागल्याने अनेक सिलेंडरचे स्फोट होत आहेत. या आगीचे भीषण व्हिडिओ टाइम्स नाऊ मराठीच्या हाती लागले आहेत. 

tanker fire osmanabad solapur highway explosion cylinder shut traffic accident news in marathi tosm 12
[VIDEO] तुळजापूर-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला, सिलेंडरचा स्फोट, वाहतूक विस्कळीत  |  फोटो सौजन्य: Times Now

उस्मानाबाद :  सोलापूर तुळजापूर रस्त्यावर तामलवाडी टोलनाक्याजवळ घरगुती गॅस टाक्या घेऊन जाणारी गाडीला आग लागल्याने अनेक सिलेंडरचे स्फोट होत आहेत. या आगीचे भीषण व्हिडिओ टाइम्स नाऊ मराठीच्या हाती लागले आहेत. 

सध्या या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून तामलवाडी गाव रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकारात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ग्रामस्थ  एकमेकांना मदत करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

खबरदारीचा उपाय म्हणून या महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच तामलवाडी गावातील काही घरे रिकामी करून त्यातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...